फरदीन खान : अभिनेता फिरोज खान यांचा मुलगा असलेल्या फरदीनचा बॉलिवूडमध्ये विशेष जम बसला नाही. २००१ साली त्याला कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.सुरज पांचोली : बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणात तिचा प्रियकर आणि अभिनेता सुरज पांचोली याला १० जून २०१३ रोजी अटक करण्यात आली होती. जियाने ३ जून २०१३ रोजी केलेल्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या आधारे ही अटक करण्यात आली होती.अरमान कोहली : बिग बॉस फेम अरमान कोहली याच्यावर सोफिया हयात खान हिने शारिरीक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी १६ डिसेंबर २०१३ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. पण दुस-या दिवशी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.राजपाल यादव : राजपाल आणि त्याच्या पत्नीविरोधात पाच कोटी रुपयांच्या रिकव्हरीची केस दाखल करण्यात आली होती. ठरवून दिलेल्या वेळेत राजपाल यादव पैसे परत देऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर खोटं बोलणं आणि खोटं प्रतिज्ञापत्र देण्याचा आरोप लावण्यात आले होते. या प्रकरणी डिसेंबर २०१३ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता राजपाल यादवची त्याच्या पत्नीसह दहा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.मोनिका बेदी : या अभिनेत्रीने जेवढी वर्षे पडद्यावर काढली आहेत त्याहून अधिक काळ तुरुंगात घालविला आहे. बनावट कागदपत्रंच्या आधारे पोतरुगालमध्ये प्रवेश करण्याबद्दल २००२ साली तिला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर भारतात २९ सप्टेंबर २००६ रोजी बनावट पासपोर्ट प्रकरणी तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली. त्या पुढील साधारण तीन वर्षे ती तुरुंगात होती.शायनी अहुजा : शायनी आहुजाने मोलकरणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण 2००९ साली घडले होतं. १४जून २००९ त्याला अटक करण्यात आली होती. यानंतर तीन महिने त्याने तुरुंगात काढले आणि ऑक्टोबर २००९मध्ये त्याला सशर्त जामीन मिळाला.सैफ अली खान : सैफ करीनासह ताज हॉटेलमध्ये डिनर करायला गेला असताना शेजारच्या टेबलवरील व्यक्तीने त्यांना शांत बसण्यास सांगितले. त्यावरून सैफच्या रागाचा पारा एवढा चढला की त्याने त्या व्यक्तीला मारहाण केली ज्यात त्या व्यक्तीचे नाक तुटले. याप्रकरणी सैफला तुरूंगाची हवा खावी लागली होती.संजय दत्त : १९९३ साली झालेल्या मुंबई बाँबस्फोटांदरम्यान बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. १९९४-९५ साली त्याने १६ महिन्यांची शिक्षा त्याने भोगली होती तसेच २००७ साली तो काही काळ तुंरागात होता. त्यामुळे उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी २०१३ साली त्याला पुन्हा तुरूंगात पाठवण्यात आले.'हिट अँड रन' प्रकरणी अभिनेता सलमान खानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणी व काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी त्याला तुरूंगाची हवा खावी लागली होती. सलमानप्रमाणेच बॉलिवूडमधील इतर अनेक सेलिब्रिटींना तुरूंगात जावे लागले होते.