शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pushpa च्या मागे-मागे चालणारा केशव आठवतोय? एकेकाळी थिएटर्समध्ये विकायचा फ्रेंच फ्राइज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 1:18 PM

1 / 11
अलिकडेच अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) याची मुख्य भूमिका असलेला पुष्पा (Pushpa)हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.
2 / 11
सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असून त्यातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्यामुळेच या चित्रपटातील केशवविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
3 / 11
पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच आणखी एक भूमिका गाजली ती म्हणजे केशवची. ही भूमिका अभिनेता जगदीश प्रताप भंडारी भंडारी (Jagadeesh Pratap Bhandari) याने साकारली आहे.
4 / 11
पुष्पाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या केशवने आपल्या संवादफेक कौशल्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे हा अभिनेता नेमका कोण आहे, तो काय करतो हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
5 / 11
केशव म्हणजेच जगदीश प्रताप भंडारी याचा जन्म तेलंगाणामध्ये १८ जानेवारी १९९३ मध्ये झाला असून तो तेलुगु कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.
6 / 11
जगदीश सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून त्याचे १३.६ हजार फॉलोअर्स आहेत.
7 / 11
जगदीश याच्या कुटुंबात आई-वडील आणि दोन बहिणी आहेत. जगदीशने पोलीस दलात कार्यरत व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. परंतु, जगदीशला अभिनयात रस होता.
8 / 11
एका मुलाखतीत जगदीशने त्याच्या कुटुंबाविषय़ी आणि करिअरविषयी अनेक खुलासे केले आहेत.
9 / 11
कलाविश्वात येण्यापूर्वी जगदीश सेल्स एक्झिकेटिव्ह म्हणून काम करायचा. तसंच त्याने थिएटर्समध्ये फ्रेंच फ्राइज आणि स्वीट कॉर्नदेखील विकले आहेत. परंतु, अनेक प्रयत्नानंतर त्याने हैदराबाद गाठलं आणि येथे प्रसाद स्टुडिओच्या एका शॉर्टफिल्ममध्ये त्याला छोटेखानी भूमिका साकारायची संधी मिळाली.
10 / 11
जगदीशने 2018 मध्ये MicTV च्या 'निरुद्योग नटुलु' (Nirudyoga Natulu) या कार्यक्रमात काम केलं. त्यानंतर 2019 मध्ये तो तेलुगू वेब सीरीज 'गॉड ऑफ धर्मापुरी' (Gods Of Dharmapuri) मध्येही झळकला. यानंतर त्याच्या लोकप्रियतेत वाढ होत गेली.
11 / 11
पुष्पानंतर जगदीश लवकरच पिक पॉकेट या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :Pushpaपुष्पाTollywoodTollywoodcinemaसिनेमाAllu Arjunअल्लू अर्जुनRashmika Mandannaरश्मिका मंदाना