शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

R. Madhavan : आर. माधवनला ऑफर झाली होती फिल्म ‘गजनी’, सांगितलं नाकारण्यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 10:27 AM

1 / 8
अभिनेता आर माधवन त्याच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी माधवनने इन्स्टाग्राम लाईव्ह सत्रादरम्यान साऊथचा अभिनेता सूर्यासोबत त्यानं संवाद साधला होता. या संवादात दोन्ही कलाकारांनी एकमेकांचे कौतुकही केलं.
2 / 8
याशिवाय त्यांनी एकमेकांच्या कामाचीही प्रशंसा केली. या संवादादरम्यान माधवनने खुलासा केला की सूर्यापूर्वी त्याला 'गजनी' या प्रसिद्ध चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती.
3 / 8
२००५ मध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचे दिग्दर्शक AR Murugadoss यांनी 'गजनी' हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट नंतर आमिर खानने २००८ मध्ये त्याच नावाने पुन्हा तयार केला.
4 / 8
या चित्रपटाची कशा अशा व्यक्तीवर आधारित होती, जी शॉर्ट टर्म मेमकी लॉसची रुग्ण आहे. तसंच ती व्यक्ती आपल्या प्रेयसीच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न करत असते. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने जबरदस्त काम केले होते आणि तो हिटही झाला.
5 / 8
त्यापूर्वी आर माधवननं तो चित्रपट नाकारला होता. मला त्याची स्टोरी आवडली नाही. मला त्याचा सेकंड हाफ आवडला नाही असं मी AR Murugadoss यांना सांगितलं. त्यानंतर हा चित्रपट तुझ्याकडे आला. त्यानंतर हा चित्रपट तुझ्याकडे आला. तो चित्रपट योग्य व्यक्तीच्या हाती गेला असं मला वाटलं. गजनी हिट झाला आणि त्याची चर्चाही झाली असं आर माधवननं म्हटलं.
6 / 8
यानंतर त्यानं सूर्याचं कौतुकही केलं. या चित्रपटासाठी तू किती मेहनत केलीस हे मी पाहिलं. ते सिक्स पॅक्स, मी असं करू शकलो असतो की नाही असा विचार मी त्यावेळी केला, असंही त्यानं सांगितलं.
7 / 8
हाच क्षण होता जेव्हा मी माझ्या करिअरमधील निवडीवर प्रश्न उपस्थित केले. माझ्या करिअरसोबत मी न्याय करत नाही, असं मला वाटलं. त्यानंतर मी माझाच सल्ला ऐकायला लागलो. तुला मी एका उदाहरणाप्रमाणे पाहिलं, असंही आर माधवननं नमूद केलं.
8 / 8
गजनीचं तामिल व्हर्जन बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरलं. त्यानंतर AR Murugadoss यांनीच या चित्रपटाचा हिंदी रिमेक केला. यामध्ये आमिर खान आणि असिन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. २००८ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला होता.
टॅग्स :R.Madhavanआर.माधवनbollywoodबॉलिवूडAamir Khanआमिर खान