शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ranbir-Alia Baby Girl: ११ व्या वर्षीच रणबीरच्या प्रेमात पडली आलिया, आता झाली त्याच्या बाळाची आई; वाचा क्युट लव्ह स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 1:16 PM

1 / 6
आलिया आणि रणबीर एकमेकांचे दिलखुलासपणे जाहीर कौतुक करतात. बॉलिवूडमधील बहुचर्चित जोड्यांपैकी ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस जास्त उतरल्याचे दिसून येते. कोरोनामुळे त्यांचा लांबलेला विवाह या वर्षी झाला आणि काही काळातच गोड बातमी आल्यामुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या मुलीचे नाव काय ठेवणार यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
2 / 6
मध्यंतरी रणबीर कतरिना यांच्या प्रेमाची चर्चा सुरू होती, मात्र त्यांचे ब्रेक अप झाले, दीपिका पदुकोण बद्दलही चर्चा सुरू होती. या सगळ्या भूतकाळाबद्दल माहीत असूनही आलिया म्हणत असे रणबीरवरचे माझे प्रेम कधीच कमी झाले नाही.
3 / 6
'ब्रह्मास्त्र' च्या सेटवर रणबीर आलियाचे प्रेम फुलले. सोनम कपूरच्या लग्नात ते पहिल्यांदा जोडीने दिसले. त्यांची केमिस्ट्री लक्षवेधक ठरली. त्यानंतर ते वरचेवर एकत्र दिसत राहिले.
4 / 6
नीतू सिंगलाही आलिया खूप आवडली होती. कपूर घराण्याच्या कौटुंबिक सोहळ्यात आलीया वरचेवर दिसू लागली. ऋषी कपूर यांनीही आलियाला सून म्हणून आधीच स्वीकारले होते. दुर्दैवाने त्यांना रणबीर आलियाचे लग्न पाहता आले नाही. २०१९ च्या सिनेअवॉर्डमध्ये आलियाने त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा झाली, मात्र कोरोनामुळे त्यांचे लग्न लांबले.
5 / 6
२०२२ च्या सुरुवातीलाच त्यांनी लग्नाची घोषणा केली आणि एप्रिलमध्ये नातेवाईकांच्या आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत छोटेखानी लग्न सोहळा पार पाडला. त्यावेळेसही त्या दोघांच्या कपड्यांची, फोटोंची भरपूर चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांचे आउटिंगचे फोटो आणि पाठोपाठ आलेली गोड बातमी वेळोवेळी चर्चेचा विषय ठरली.
6 / 6
६ नोव्हेंबर २०२२ रोजी आलियाला मुलगी झाल्याचे कळताच सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतकाचा वर्षाव झाला. एवढेच नाही तर मुलीचे नाव काय ठेवणार यावरही चर्चा सुरू झाली. आलिया आणि रणबीर दोघेही दिसायला गोड असल्यामुळे त्यांची लेक किती गोड असेल हे पाहण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत!
टॅग्स :Alia Bhatआलिया भटRanbir Kapoorरणबीर कपूर