Samantha Ruth Prabhu has reportedly filed defamation cases against some YouTube channels
शिकवीन चांगलाच धडा....! गर्भपात, अफेअरच्या बातम्या देणाऱ्या युट्यूब चॅनलला सामंथाचा दणका By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 5:23 PM1 / 7अभिनेता नागा चैतन्य बरोबर झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूनं अखेर खोट्या बातम्या पसरवणा-यांना चांगलाच दणका दिला. खोट्या बातम्या पसरवणाºया युट्यूब चॅनल्सविरोधात कारवाई करण्याचा निर्णय सामंथाने घेतला आहे.2 / 7 अनेक युट्यूब चॅनल्सनी सामंथाचे विवाहबाह्य संबंध असून तिने गर्भपात केल्याच्या बातम्या दिल्या होत्या. या बातम्यांनी सामंथा चांगलीच बिथरली आहे.3 / 7काही युट्यूब चॅनल्सना तिने नोटीस पाठवली आहे. तिच्या पीआरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 4 / 7सामंथा सध्या तिची जवळची मैत्रीण शिल्पा रेड्डी सोबत ऋषीकेश येथे आहे.5 / 7 सुमन टीव्हीला सुद्धा सामंथाने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याशिवाय तिच्यावर गर्भपाताचा आरोप करणारे वकील वेंकट राव यांना सुद्धा तिने नोटीस पाठवली आहे.6 / 7घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर अनेकांनी आपआपले तर्कवितर्क लढवले होते. सामांथाच्या प्रेमप्रकरणामुळे तिच्यात आणि नागा चैतन्यात दुरावा निर्माण होवून घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 7 / 7 काही चॅनल्सने तर सामंथाचं तिच्या डिझायनरसोबत अफेअर असल्याचं म्हटलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications