shahrukh khan broke 20 year old tradition on his 56th birthday
आर्यनमुळे शाहरुखने तोडली २० वर्षांपूर्वीची परंपरा?; चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 10:36 AM1 / 10बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अलिकडेच त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी शाहरुखच्या वाढदिवशी चाहते त्याला वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असतात.2 / 10शाहरुखचा वाढदिवस म्हणजे चाहत्यांसाठी एखादा सण किंवा उत्सवच असतो. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून या दिवशी चाहते मन्नत बाहेर येऊन तासनतास शाहरुखची वाट पाहतात.3 / 10विशेष म्हणजे शाहरुखच्या वाढदिवशी चाहत्यांनी एक परंपरा सुरु केली होती. आणि. ही परंपरा शाहरुखदेखील दरवर्षी नियमितपणे पार पाडतो.4 / 10मागील २० वर्षांपासून चाहते शाहरुखच्या वाढदिवशी मन्नतच्या बाहेर उभे राहतात आणि शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी धडपड करतात.5 / 10शाहरुखदेखील चाहत्यांच्या प्रेमाचा मान ठेवत मन्नतच्या टॉप फ्लोअरवर येऊन त्यांना भेट देतो. 6 / 10गेल्या २० वर्षांपासून शाहरुख त्याच्या वाढदिवशी मन्नतच्या टॉप फ्लोअरवर येऊन चाहत्यांना हात दाखवून त्यांचे आभार मानतो. परंतु, यावेळी शाहरुखने त्याची ही परंपरा मोडली आहे.7 / 10शाहरुखला त्याच्या मुलामुळे आर्यन खानमुळे त्याची ही परंपरा मोडावी लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी आर्यनला अटक करण्यात आली होती.8 / 10आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरुख प्रचंड चिंताग्रस्त होता. त्यामुळे आर्यनची जामीनावर सुटका झाल्यानंतर शाहरुख सध्या त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. मात्र, या काळात तो कुटुंबाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाहीये. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच तो वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना भेटू शकला नाही.9 / 10३ नोव्हेंबर १९६५ मध्ये शाहरुखचा दिल्लीत जन्म झाला असून किंग खान आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो.10 / 10'बाजीगर', 'दीवाना', 'दिलवाले दुलहनिया ले जाएंगे', 'मैं हूं न', 'डर', 'ओम शांति ओम' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications