मी स्वत: देवळात जाण्यापेक्षा एखाद्या गायकाच्या मैफिलीत जाणं पसंत करतो कारण तिथे मला निखळ आनंद अनुभवायला मिळतो. माझ्याकडून कोणी काही मागत नाही तर मला भरभरून मिळत असतं. आणि या चित्रपटाच्या माध्यमातूनही आम्ही प्रेक्षकांनाही हाच आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे असे सुबोध म्हणाला.मी स्वत: अनेक वर्ष गाणं शिकले आहे आणि नृत्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. त्यामुळे या चित्रपटातील गुर-शिष्याचे नाते अनुभवणारी उमाची भूमिका मला अतिशय जवळची वाटली आणि मी तितक्याच तन्मयतेने निभावू शकले अशा शब्दांत मृण्मयी देशपांडेने तिचा चित्रपटाचा अनुभव शेअर केला.कविराज हा अतिशय साधा माणूस असून तो नेहमी सत्याची चांगुलपणाची कास धरूनच चालताना दाखवला आहे असे पुष्करने सांगितले.आपल्या मागच्या पिढीतील गायक संगीतकारांनी एवढं मोठं काम करून ठेवलं आहे ना की त्यामुळेच आपलं आयुष्य समृद्ध झालं आहे आणि तेच संगीत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं त्यांना आनंद मिळावा याच हेतूने आम्ही हा चित्रपट तयार केला आहे असे सुबोध म्हणाला.या चित्रपटात मी कविराजची भूमिका केली असून त्याच्याकडे लिहीण्याची कविता करण्याची प्रतिभा लाभली आहे मात्र त्याला गाण्याचे अंग न वारसा नाही आणि हेच त्याचं दु:ख आहे असे अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला.ज्या संगीताने माझ्या आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण आणले तोच आनंद लोकांना देण्यासाठी आम्ही चित्रपट दिवाळीला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला असे सुबोधने सांगितले.दिवाळीच्या मुहूर्तावर येत्या १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणा-या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे याने.मराठी संगीत रंगभूमीवरील मानाचं पान असलेले अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. हेच नाटक आता भव्य रूपात चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमतच्या कार्यालयाला भेट देऊन दिलखुलास गप्पा मारल्या. ( फोटो : स्वप्नील साखरे)