शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Yuzvendra Chahal Dhanashree Verma: "हीच खरी परिस्थिती आहे", धनश्रीची Instagram वर भली मोठी पोस्ट; युजवेंद्र चहलनेही तिथेच केली कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 6:10 PM

1 / 9
Yuzvendra Chahal Dhanashree Verma: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी मॉडेल-प्रोफेशनल डान्सर धनश्री वर्मा यांच्यात काही तरी बिनसलं असल्याची चर्चा होती. या चर्चांना गेल्या काही दिवसात प्रचंड उधाण आले होते. चहल पती-पत्नींनी एक छोटासा मेसेज इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करून या साऱ्या अफवा असल्याचे सांगितले होते. तरीही या चर्चांना पूर्णविराम मिळाला नव्हता. अखेर आज, धनश्रीने भली मोठी सोशल मीडिया पोस्ट लिहीत सत्यपरिस्थिती सर्वांसमोर मांडली. त्यावरच, युजवेंद्र चहलनेही कमेंट केली. पाहा नक्की काय घडलं...
2 / 9
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये साखरपुडा केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या दोघांनी याची घोषणा केली होती. त्यानंतर २२ डिसेंबर २०२० मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघे सोशल मीडियावर अँक्टीव्ह असल्याने त्यांचे अपडेट्स सातत्याने मिळत असतात. पण गेल्या काही दिवसात ज्या चर्चा रंगल्या त्यानंतर धनश्रीने अखेर मौन सोडले आणि जे काही घडतंय त्यावर रोखठोक शब्दांत आपली टिपण्णी मांडली.
3 / 9
'सुप्रभात मित्रांनो, आता मी सांगत आहे ती आहे खरी परिस्थिती. आजची माझी सकाळ जरा उशिराच झाली. मी खूप जास्त झोपले कारण 'त्यातून' सावरण्यासाठी मला झोप गरजेची होती. तुम्हाला कदाचित विनोदी वाटेल पण आज जेव्हा मी झोप पूर्ण करून उठले तेव्हा मला खूप पॉझिटिव्ह आणि छान वाटलं. १४ दिवसांपासून मी या दिवसाची वाट पाहत होते. कारण मी माझा आत्मविश्वास गमावून बसले होते', अशी धनश्रीने आपल्या पोस्टची सुरूवात केली.
4 / 9
'इन्स्टाग्रामसाठी रील शूट करत असताना मी डान्स करताना पडले आणि माझ्या गुडघ्याला दुखापत झाल्याने लिगामेंट टिअर झालं. मी घरात फक्त बेड ते काऊच इतकीच चालू शकत होते, त्यासाठीही मला फिजीओची मदत घ्यावी लागत होती. पण आता मी सावरते आहे. आणि त्यात मला माझ्या जवळच्यांचा पाठिंबा खूप फायद्याचा ठरला. मला सावरण्यासाठी मदत केल्याबद्दल माझा नवरा (युजवेंद्र चहल), माझे कुटुंब आणि माझे जवळचे मित्र यांचे मी आभार मानते', असे धनश्रीने स्पष्ट करत युजी चहल आणि तिच्यात सारं आलबेल असल्याचे संकेत दिले.
5 / 9
पुढे तिने लिहिले, 'मला डॉक्टरने शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार मी लवकरच शस्त्रक्रियेला सामोरी जाणार आहे कारण मला आयुष्यात पुन्हा डान्स करायचा असेल, तर ती खूप गरजेची आहे. गेले काही दिवस मला दैनंदिन गोष्टीही करायला जमत नव्हत्या. त्यामुळे खूप निराश झाले होते. मला ज्या वेळी सर्वाधिक मानसिक शांतता आणि आधाराची गरज होती त्याच वेळी लोकांनी कोणती तरी एक बातमी उचलली आणि त्यावरून खूप वाईट साईट बोलले. माझ्याबद्दलच्या लोकांच्या अशा प्रकारच्या भावना पाहून मी खरंच खूप खचून गेले.'
6 / 9
'आता सध्या माझ्यासमोर एक खूप मोठं चॅलेंज आहे, ते म्हणजे या दुखापतीतून सावरून मी पुढील आयुष्य कशाप्रकारे जगणार आहे. मला इतके दिवस खूप भीती वाटत होती, पण आज अचानक मी झोपेतून उठल्यावर माझी भीती नाहीशी झाली. कारण मला समजलं की माझ्यावर कितीही वाईट वेळ आली, कोणी कसंही वागलं, काहीही बोलली, तरी मी त्यातून समर्थपणे बाहेर पडू शकते. मी कोणत्याही परिस्थितीतून पूर्णपणे बरी होऊ शकते', असा खोचक टोला तिने टीकाकारांना लगावला.
7 / 9
'मी माझ्या आयुष्यात खूप मेहनत केली आहे. मी जे मिळवलं आहे, त्या खूप कष्टाने मिळवलं आहे आणि अतिशय परिश्रमाने मी लोकांचा आदर मिळवू शकले आहे. त्यामुळे एखाद्या दुखापतीमुळे किंवा एखाद्या तथ्य नसलेल्या अफवेमुळे मी लोकांच्या मनातील तो आदर नक्कीच गमावणार नाही. याऊलट अशा परिस्थितीने मला अधिकच आत्मविश्वास दिला आणि मला अधिक निर्भिड बनवले. आता मी अशा मानसिक परिस्थितीत पोहोचले आहे की माझ्यात काहीही पचवण्याची आणि सहन करण्याची क्षमता आहे.
8 / 9
'या विचित्र अनुभवाने अजून शहाणी झाले आहे. आता मला कळून चुकलंय की लोक बोलत राहतात, त्यांना बोलू द्यावं. सत्य काय आहे ते आपल्याला माहिती असतं. माझ्या कमकुवत गोष्टींना बळ देऊन सकारात्मता दिल्याबद्दल साऱ्यांचेच धन्यवाद. सगळ्यांनी समाजाचा आनंद घेऊया आणि समाजात आनंद वाटूया, इतर नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करूया- तुमची DVC (धनश्री वर्मा चहल)', असेही लिहीत तिने स्वत:चे चहल अडनाव कायम असल्याचेही दाखवून दिले.
9 / 9
धनश्रीने आपल्या भावनांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट करून दिली. युजवेंद्र चहल सध्या क्रिकेटच्या दौऱ्यावर असल्यामुळे धनश्रीसोबत नाहीये. पण धनश्रीने ही पोस्ट लिहिल्यानंतर त्याने आपल्या पत्नी समर्थपणे पाठिंबा दर्शवला. 'माझी बायको सक्षम आहे', अशा आशयाची कमेंट त्याने या पोस्टवर केली आणि चहल पती-पत्नी यांच्यात सारं काही आलबेल असल्याच्या धनश्रीच्या पोस्टला दुजोरा दिला. त्यामुळे तूर्तास या चर्चांवर पडदा पडला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
टॅग्स :yuzvendra chahalयुजवेंद्र चहलInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल