Benefits of eating green apples
लालपेक्षा हिरवे सफरचंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्.... By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 2:54 PM1 / 5जर रोज सफरचंद खाल्लं तर आरोग्यासाठी चांगल असतं. असे आपण अनेकदा ऐकलं आहे. पण तुलनेने हिरवं सफरचंद खाणे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं. हिरवी सफरचंदंही लाल सफरचंदासारखंच गोड असतात. फारसं हिरवी सफरचंद लोकं खात नाहीत. हिरव्या रंगाचे सफरचंद लाल रंगाच्या सफरचंदापेक्षा काही प्रमाणात महाग असतात. मात्र यात मोठ्या प्रमाणात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अनेक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट्स असतात. हिरव्या सफरचंदाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चला तर मग जाणून घेऊया हिरव्या सफरचंदाचे फायदे काय आहेत.2 / 5दररोज डाएटमध्ये सामील केल्यास तुम्ही उत्साही रहाल. हिरव्या सफरचंदात काही अॅन्टीएजिंग गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमचं तारुण्य दीर्घकाळ टिकून राहतं3 / 5त्याचप्रमाणे पचनसंस्था सुरळीत राहते. हिरव्या सफरचंदामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते. यातील फायबर सोप्या पद्धतीने पचले जातात. यामुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. तसेच वेगाने वजन कमी होण्यास मदत होते.4 / 5 गर्भवती स्त्रीला ह्या दिवसात मलावरोधाची व पचनाची खूप समस्या येत असते. आणि ही समस्या सर्वच स्त्रियांना येत असते. म्हणून जर तुम्ही ह्या वेळी हिरवे ऍपल खाल्ले तर ही समस्या येत नाही.5 / 5ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा व्यक्तींना सफरचंदाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. हिरव्या सफरचंदातील पोषक तत्त्वांमुळे रक्तातील शर्करा नियंत्रित येते. आणखी वाचा Subscribe to Notifications