Benefits of eating Singhara or water chestnut in winter
तुम्हालाही माहीत नसतील हिवाळ्यात मिळणाऱ्या शिंगाड्याचे फायदे, वाचाल तर रोज खाल! By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 3:01 PM1 / 8Water Chestnut Benefits : हिवाळ्यात बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या फळांसोबत एक वेगळं फळ दिसतं ते म्हणजे शिंगाडे. वरून कालं कवच आणि आतून पांढरा गर असलेलं हे फळ लोक खूप आवडीने खातात. काही लोक शिंगाडे कच्चे खातात, कुणी उकडून खाता तर कुणी शिंगाड्याच्या पिठाचा वापर करतात. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी, मॅगनीज, प्रोटीन, थायमाइन आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण लोकांना या फळाच्या सेवनाने फायदे माहीत नसतात. ते आज आज आम्ही सांगणार आहोत.2 / 8शिंगाड्यामध्ये आयोडिन आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतं. हे तत्व थायरॉईडच्या समस्येमध्ये खूप फायदेशीर ठरतात. यातील आयोडिनने घशासंबंधी समस्यांपासून बचाव होतो. जर तुम्हाला थायरॉईड असेल तर तुमच्यासाठी शिंगाडे फायदेशीर ठरतात. 3 / 8पोटाची समस्या दूर करण्यात सिंगाडे फायदेशीर ठरतात. एक्सपर्टनुसार, शिंगाड्याचं पीठ आतड्यांसाठी खूप फायदेशीर असतं. याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते.4 / 8शिंगाड्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत मिळते. जर तुम्ही कमी प्रमाणात पाणी पित असाल, डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. अशात तुम्ही या फळाचं सेवन करून शरीरात पाणी नियंत्रित ठेवू शकता. 5 / 8सिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात आढळतं. जर तुम्ही याचं सेवन नियमितपणे केलं तर हाडे आणि दातही मजबूत होतात.6 / 8सिंगाड्याचं सेवन केसांची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यातील लॉरिक अॅसिड केसांना मजबूत करण्यास मदत करतं.7 / 8खोकल्याची लक्षणं शांत करण्यासाठी शिंगाडा प्रभावी ठरतो. सिंगाडे बारीक करून चूर्ण बनवून रस, चहा किंवा पाण्यासोबत सेवन केल्याने खोकला दूर होतो. सिंगाड्यातील अॅंटी-ऑक्सिडेंट घशाच्या समस्यांमध्ये आराम देण्याचं काम करतात. सोबतच याच्या चहाने कफ कमी होण्यासही मदत मिळते.8 / 8शिंगाड्याचं सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरत दूर होते. त्याचबरोबर पोटाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरतं. शिंगाडा शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचं सेवन करावं. आणखी वाचा Subscribe to Notifications