benefits of onion skin
कांद्याच्या सालीचे असेही फायदे; जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 7:06 PM1 / 6कांद्याचे काय फायदे आहेत हे जवळपास सर्वांनाच माहीत असावेत. पण कांदा कापल्यानंतर जी साल आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो त्याचे फायदे अनेकांना हे माहीत नाहीत. कांद्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काद्यांची साल उपयोगी पडू शकते. चला जाणून घेऊया कांद्याच्या सालीचे फायदे.2 / 6कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यास शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. परिणामी हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. 3 / 6जर तुम्हाला स्कीन अॅलर्जीची समस्या असेल तर कांद्याची साल तुम्हाला फायदेशीर ठरते. रात्रभर कांद्याची साल पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी स्किनवर लावा. काही दिवसांतच आराम मिळेल. 4 / 6मुली केसांना मुलायम आणि चमकदार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कंडीशनर वापरतात. पण कांद्याच्या सालीचा वापर करून तुम्ही केस मुलायम आणि चमकदार करू शकता. त्यासाठी केस धुताना कांद्याच्या सालीचा वापर करा. 5 / 6चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही कांद्याच्या सालीचा वापर होतो. कांद्याच्या सालीमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डागांपासून सुटका होते. 6 / 6गाल कोरडे झाल्यास कांद्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कांद्याची साल गरम पाण्यात उकळून त्याचा वापर करा. याने गाल मुलायम होतील. आणखी वाचा Subscribe to Notifications