1 / 6उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारचे अन्नपदार्थ खराब होऊ नयेत म्हणून फ्रिजमध्ये ठेवले जातात. मात्र काही अन्नपदार्थ हे चुकूनही फ्रिजमध्ये ठेववता कामा नयेत. कारण फ्रिजमध्ये ठेवून अशा पदार्थांचे सेवन करणे प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकते. 2 / 6केळी कधीच फ्रिजमध्ये ठेवू नयेत. असे केल्यामुळे केळी काळी पडून लवकर खराब होऊ शकतात. केळ्यांमध्ये इथाईलीन नावाचा गॅस असतो. तो बाहेर आल्याने फ्रिजमधील इतर पदार्थही खराब होऊ शकतात. 3 / 6लसूण ही फ्रिजमध्ये ठेवता कामा नये, फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ती ओलसर होऊन अंकुरित होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती खराब होऊ शकते. 4 / 6कॉफी फ्रिजमध्ये ठेवता कामा नये. फ्रिजमध्ये ठेवल्याने कॉफी खराब होऊ शकते. त्यामुळे ती नेहमी कोरड्या जागी ठेवावी. 5 / 6लोणचे फ्रिजमध्ये ठेवता कामा नये. लोणच्यामध्ये व्हिनेगर असते. त्यामुळे केवळ लोणचेच नाही तर इतर वस्तूसुद्धा खराब होऊ शकतात. 6 / 6मधसुद्धा फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे आहे. फ्रिजमध्ये ठेवल्याने मध गोठते. तसेच याची चवसुद्धा खराब होते.