शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑफिसमध्ये एनर्जेटिक राहायचंय, मग 'हे' 5 पदार्थ नक्की खा !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 5:33 PM

1 / 6
सतत ऑफिसमध्ये बसून काम केल्याने एनर्जीची कमतरता जाणवते. अशातच मूड फ्रेश ठेवण्यासाठी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी मध्ये मध्ये काहीतरी खात राहणं आवश्यक असतं. तुम्ही जे पदार्थ खाता त्यांचा सरळ परिणाम तुमच्या आरोग्यावर, फिटनेसवर आणि त्वचेवर दिसून येत असतो. अनेकदा लोकं संध्याकाळच्या वेळी ऑफिसमध्ये जंक फूड खातात. त्यामुळे त्यांना लठ्ठपणासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण त्याऐवजी तुम्ही थोडी काळजी घेतली आणि प्लॅनिंग केल तर तुम्ही ऑफिसमध्ये जंक फूड खाण्यापासून स्वतःला दूर ठेवू शकता.
2 / 6
चण्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं. तसेच यामुळे आरोग्याला कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही.
3 / 6
कुरमुरे फक्त वजनासाठी हलके असतात पण पचण्यासाठीही हलके असतात. बाजारात मिळणाऱ्या जंक फूडपेक्षा घरीच कुरमुऱ्यांचा चिवडा किंवा इतर पदार्थ तयार करून खाणं फायदेशीर ठरतं.
4 / 6
काजू, मणूके, बदाम, अक्रोड इत्यादी पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं. तसेच याव्यतिरिक्त हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. जे भूक कमी करण्यासोबतच हेल्दी ठेवण्यासाठीही मदत करतात. आपल्या ऑफिसच्या बॅगमध्ये एक मुठभर ड्रायफ्रुट्स ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
5 / 6
घरीच मसाला कॉर्न तयार करून तुम्ही ऑफिसमध्ये खाण्यासाठी डब्यातून घेऊन जाऊ शकता. त्यासाठी कॉर्न उकडून त्यामध्ये मीठ आणि थोडासा चाट मसाला एकत्र करा. याव्यतिरिक्त काही हिरव्या पालेभाज्या, टॉमटो, कांदा इत्याही पदार्थांचाही समावेश करू शकता.
6 / 6
मोड आलेली कडधान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मूग किंवा चणे यांसारखी तुम्हाला आवडणारी कडधान्य पाण्यामध्ये उकडून त्यामध्ये कांदा, टॉमेटो, मिरची आणि मीठ एकत्र करा. खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असून आरोग्यासाठी पौष्टिक ठरतात.
टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स