famous STREET FOODS IN NAGPUR
नागपुरात असाल, तर 'या' पदार्थांची चव नक्की चाखा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 1:40 PM1 / 6तर्री पोहा: तर्री पोहा खाल्ल्याशिवाय नागपूर भेट पूर्णच होऊ शकत नाही. नागपुरात अनेक ठिकाणी तुम्हाला तर्री पोह्याची चव चाखता येईल. 2 / 6चाट- नागपुरात अनेक ठिकाणी चाटवर आडवा हात मारला येईल. पाणीपुरी, शेवपुरी आणि पावभाजी असे अनेक पदार्थ नागपुरातील रस्त्यावर मिळतात. 3 / 6सामोसा- सामोसा आणि चहाचा आस्वाद तुम्हाला नागपुरात अनेक ठिकाणी घेता येईल. 4 / 6पतोडी- नागपूरची पतोडी भाजी अतिशय प्रसिद्ध आहे. बेसनपासून तयार करण्यात आलेली पतोडी आणि सोबत विविध मसाल्यांपासून तयार करण्यात आलेली तर्री यांची चव एकदा तरी चाखायलाच हवी. 5 / 6जिलेबी- तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील, तर जिलेबीचा आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. मोठमोठ्या कढयांमध्ये तळण्यात येणारी जिलेबी पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. 6 / 6मिसळ पाव- संपूर्ण राज्यात मिसळ पाव अगदी चवीनं खाल्ला जातो. नागपूरदेखील याला अपवाद नाही. तुम्हाला नागपुरात अनेक ठिकाणी लज्जतदार मिसळ पावची चाव चाखता येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications