Food: Eating the same poha for breakfast? Be careful, it can be harmful to health
Food: नाश्त्यामध्ये सारखे पोहे खाताय? व्हा सावध, आरोग्याला होऊ शकता हे अपाय By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 5:29 PM1 / 6बहुतांश लोक आपल्या नाश्त्यामध्ये असे पदार्थ समाविष्ट करतात जे खाण्यास हलके आणि लवकर तयार होणारे असतात. अशाच पदार्थांमध्ये पोह्यांचा समावेश होतो. पोहे खाण्यास खूप चविष्ट असतात. 2 / 6मात्र दररोज नाश्त्यामध्ये पोहे खाल्ल्याने तुमचे वजन वाढण्यासह लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते. त्यामुळे दररोज पोहे खाणे टाळा. 3 / 6मधुमेहाच्या रुग्णांना भातापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण भात खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते. पोहेसुद्धा तांदळापासूनच तयार होतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी पोहे खाणे टाळले पाहिजे. कारण त्यामुळे ब्लड शुगल लेव्हल वाढू शकते. 4 / 6अनेक लोकांना नाश्त्यामध्ये पोहे खाल्ल्यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. त्यामुळे पोटात दुखत असेल तर पोहे खाणे टाळले पाहिजे. कारण पोहे खाल्ल्याने पोटामध्ये दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 5 / 6पोहे खाल्ल्याने तुम्हाला होणारं सर्वात मोठं नुकसान म्हणजे तुमच्या दातामध्ये दुखण्याची तक्रार निर्माण होऊ शकते. कारण शिजवताना अनेकदा पोहे कच्चे राहतात. त्यामुळे दातदुखी निर्माण होऊ शकते. 6 / 6पोहे खाल्ल्यामुळे तुम्हाला उलटी मळमळण्यासारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे खाणे टाळा. आणखी वाचा Subscribe to Notifications