Food items new moms must have to increase breast milk
ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिलांसाठी 'हे' पदार्थ ठरतील हेल्दी! By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 2:47 PM1 / 8आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. बाळाला आईचं दूध मिळालं तर त्याशिवाय त्याला दुसरं काहीही देण्याची गरज नसते. अनेकदा डॉक्टर्स प्रसूती झालेल्या महिलेला बाळाला जन्मानंतर 6 महिन्यांपर्यंत फक्त आणि फक्त आईचंचं दूध द्यायला सांगतात. जशी बाळाची वाढ होते, तसं त्याला जास्त दूधाची गरज भासते. अशातच अनेकदा आईचं दूध बाळासाठी अपूरं पडतं. बाळाला योग्य प्रमाणात ब्रेस्ट मिल्क मिळावं म्हणून आईला पोषक तत्व असलेला आहार घेणं आवश्यक असतं. काही पदार्थांचं आईने सेवन करणं हे बाळासोबतच तिच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया काही पदार्थ ज्यांचं सेवन करणं आईसाठी आणि नवजात बालकासाठी उपयोगी ठरतात. 2 / 8फक्त गरोदरपणातच नाही तर बाळाच्या जन्मानंतरही आईसाठी आरोग्यदायी आहार घेणं गरजेचं असतं. पोषक तत्व असलेल्या ड्रायफ्रुट्सचा समावेश हेल्दी फूड्समध्ये करण्यात येतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतरही आईने काजू, बदाम आणि अक्रोड खाणं फायदेशीर असतं. तसेच नट्समध्ये असलेली पोषक तत्व सेरोटोनिनचं प्रोडक्शन वाढविण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. 3 / 8ओटमील आयर्नचा सर्वात बेस्ट सोर्स मानला जातो आणि बाळंत झालेल्या महिलांना आयर्नची अत्यंत आवश्यकता असते. कारण गरोदरपणात अनेक महिलांना अनीमियासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. अशात आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी आहारात ओटमीलचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. तसेच यामुळे शरीरामध्ये रेड ब्लड सेल्सही वाढतात. 4 / 8ब्रेस्टफइडिंग करणाऱ्या आईला ब्रेस्ट मिल्कचं प्रमाण वाढविण्यासाठी लसूण मदत करतो. त्याचबरोबर मुलांना पोटदुखी आणि कॉलिकपासून सुटका मिळवण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्हाला लसणाची आफ्टरटेस्ट आवडत नसेल तर तुम्ही लसणाच्या गोळया खाऊ शकता. यामुळे लसणाच्या फायदे मिळतीलचं पण त्याची चवही तोडांत येत नाही. 5 / 8गरोदरपणात पपई खाण्यास मनाई करण्यात येते. कारण पपई निसर्गतः उष्ण असते. परंतु बाळाच्या जन्मानंतर पपई खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं. अशातच कच्ची पपई खाल्याने शरीरामध्ये ऑक्सिटोसीन नावाचे हार्मोन्स तयार करण्यासाठी मदत करतात. तसेच ब्रेस्ट मिल्कमध्येही वाढ होते. तुम्ही कच्ची पपई उकळवून खाऊ शकता किंवा त्यापासून एखादी टेस्टी डिशही तयार करू शकता. 6 / 8बडिशेपचं सेवन केल्याने अॅस्ट्रोजन नावाचे हार्मोन्स तयार होतात. जे लॅक्टेशनमध्ये मदत करतात आणि ब्रस्ट मिल्क वाढविण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर मेथीचे दाणे मिल्क फ्लो वाढविण्यासाठी उत्तम मानले जातात. 7 / 8गाजरही ब्रेस्ट मिल्कसाठी फायदेशीर ठरत असून त्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळून येतं. हे व्हिटॅमिन बाळांच्या वाढिसाठी अत्यंत आवश्यक असतं. पालकही आयर्नचा उत्तम स्त्रोत मानला जातो. पालकामुळे शरीरातील आयर्नचे प्रमाण वाढण्यास मदत होते. 8 / 8मिनरल्स, विटमिन्स आणि प्रोटीनयुक्त डाळीही ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिलांसाठी उत्तम ठरतात. त्यामुळे ब्रेस्ट मिल्क वाढविण्यासाठी डाएटमध्ये डाळींचा समावेश करणं फायेदशीर ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications