food joints in mumbai famous for misal pav
'ही' मिसळ खाऊन येईल तर'तर्री'.... मुंबईतल्या खवय्यांसाठी खास स्पॉट्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 5:30 PM1 / 10मुंबईत हल्ली अनेक ठिकाणी मिसळ महोत्सव होऊ लागलेत. त्याला होणारी गर्दी पाहता, मुंबईकरांचं मिसळप्रेम सहज लक्षात येऊ शकतं. अशा मिसळप्रेमी खवय्यांसाठी काही खास स्पॉट्स... इथली मिसळ खायलाच पाहिजे बॉस!2 / 10गिरगावमधील विनय हेल्थ होम म्हणजे खादाड मंडळींसाठी नंदनवनच. इथली मिसळ खरोखरच एक नंबर. विनयची उसळ चटकदार असतेच, पण त्यासोबत दिला जाणारा चिवडा तिला वेगळ्याच उंचीवर नेतो. 3 / 10नगरकरांची मनं जिंकणारे मारुतीराव मिसळवाले मिसळ-पुरीची आपली स्पेशल डिश घेऊन मुंबईकरांच्या सेवेतही रुजू झालेत. लोअर परेल इथं त्यांचं देखणं हॉटेल नजरेत भरतं. मिसळ-पाव खाणाऱ्या मुंबईकर खवय्यांना त्यांची मिसळ-पुरीही भलतीच पसंत पडलीय. 4 / 10पूर्वीच्या गिरणगावातील - अर्थात लालबाग-परळमधील खवय्यांचं हक्कांचं ठिकाण म्हणजे लाडूसम्राट. इथल्या मिसळीची चव जरूर चाखायला हवी.5 / 10सीएसएमटी स्टेशनच्या बरोब्बर समोर असलेल्या आराम नावाच्या छोट्याशा हॉटेलनं कित्येकांच्या पोटाला आधार दिलाय. आरामचा वडा पाव चांगलाच हिट आहे, पण त्यांच्या मिसळीनंही अनेकांचं दिलखुश करून टाकलंय. 6 / 10प्रकाशची मिसळ म्हणजे 'क्या बात है', हे वाक्य तीन पिढ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं, यातूनच तिचं माहात्म्य सहज लक्षात येतं. 7 / 10दादरच्या 'आस्वाद'मधील स्वादाचं काय वर्णन करावं. कुठल्याही मराठमोळ्या पदार्थाचं नाव घ्या, तो आस्वादमध्ये हमखास मिळतो. इथली मिसळही लाजवाब. तिची ख्याती जगभर पोहोचली आहे. 8 / 10गिरगावातील 'कोल्हापुरी चिवडा' या प्रसिद्ध हॉटेलमधील मिसळही 'टेस्ट में बेस्ट'च आहे. 9 / 10चेंबूरचं भट विश्रांती गृह दिसायला अगदीच साधं, पण इथल्या मिसळीची चव जिभेवर रेंगाळते. 10 / 10वांद्र्यातील मातोश्री क्लबसमोरच्या अमेय रेस्टॉरंटमधील मिसळीची चव आईच्या हातच्या चवीसारखीच मनात घर करते. आणखी वाचा Subscribe to Notifications