शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Food: उन्हाळ्यात अवश्य खा या पाच भाज्या, शरीराला ठेवतील कूल आणि हायड्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 4:04 PM

1 / 6
उन्हाळ्यामध्ये गरमीच्या तीव्रतेपासून दिलासा मिळवण्यासाठी लोक एसी, कूलरपासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्सची मदत घेतात. मात्र याच्या माध्यमातून मिळणारा दिलासा हा काही वेळापुरताच असतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या मोसमात आहारामध्ये अशा पदार्थांचा समावेश केला पाहिजे जे तुमच्या शरीरामध्ये थंडावा दीर्घकाळ टिकवून ठेवतील. आज आम्ही तुम्हाला अशा पाच भाज्यांबाबत सांगणार आहोत, ज्यांच्या समावेशामुळे तुम्हाला उन्हाळ्यापासून दिलासा मिळेल.
2 / 6
शरीराला थंड ठेवण्यामध्ये टोमॅटो खूप मदत करतो. यामध्ये ९५ टक्क्यांपर्यंत पाणी असतं. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यामध्ये खूप मदतगार ठरते. एवढंच नाही तर यामध्ये असलेलं लायकोपिन प्रकृतीसाठी खूप फायदेशीर असते.
3 / 6
खूप पोषक तत्त्वे असलेला दुधी तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता. दुधी शरीराल थंड आणि हायड्रेट ठेवण्यामध्ये मदत करतो. तसेच दुधीमध्ये असलेले कॅल्शियम हाडांना मजबुती देते.
4 / 6
काकडीमध्येही सुमारे ९५ टक्के पाणी असतं. तेसुद्धा शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवण्यामध्ये उपयुक्त आहे. एवढेच नाही तर यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी प्रकृतीला अनेक प्रकारचे फायदेही होतात.
5 / 6
पालेभाज्या प्रकृतीसाठी खूप उपयुक्त असतात. तसेच उन्हाळ्यामध्ये पालक, मेथी, पुदिना यासारख्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्या शरीराला हायड्रेट ठेवण्यामध्ये मदत करतात.
6 / 6
कारले कडू असले तरी ते प्रकृतीसाठी खूप फायदेशीर असते. मात्र कारले हे शरीराला थंड ठेवते. तसेच पचनतंत्र आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यामध्येही मदत करते.
टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स