शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील 'या' प्रसिद्ध खाद्यपदार्थांवर परदेशात आहे बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 3:51 PM

1 / 6
भारतातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ हे परदेशातील नागरिकांनाही आकर्षित करतात. मात्र तुम्हाला माहितीये का? असे काही पदार्थ आहेत की ज्यांना पाहिल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण या पदार्थांवर परदेशात बंदी घालण्यात आली आहे. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.
2 / 6
जेली स्वीट्स - जेली हा पदार्थ सगळ्यांनाच फार आवडतो. मात्र जेलीमध्ये कोंजॅक नावाचा पदार्थ असतो. तो शरिरासाठी अत्यंत घातक मानला जातो. त्यामुळेच युरोपमधील अनेक भागात जेलीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
3 / 6
मध - मध हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. मात्र एका रिपोर्टमध्ये आशियामध्ये तयार होणाऱ्या मधात हानिकारक अॅन्टीबायोटीक्स असल्याचं समोर आलं होतं. याच कारणामुळे आशियातील मधाला युरोपमध्ये बंदी आहे.
4 / 6
रेडबुल - एखाद्या ठिकाणी पार्टी असेल तर रेडबुलसारख्या एनर्जी ड्रिंकशिवाय ती पूर्ण होत नाही. मात्र रेडबुल प्यायल्याने डिप्रेशन, हायपरटेंशन आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच फ्रान्स आणि डेन्मार्कमध्ये रेडबुलवर बंदी आहे.
5 / 6
कॅचअप - कचोरी, भजी खाताना आपण न चुकता कॅचअप खातो. मात्र फ्रान्समध्ये कॅचअपवर बंदी घालण्यात आली आहे. तेथील लहान मुलं पारंपारिक भोजन विसरून कॅचअपकडे आकर्षित होत असल्याने फ्रान्समध्ये त्याला बंदी घालण्यात आली आहे.
6 / 6
पाश्चराईझ्ड दूध - भारतात पाश्चराईझ्ड दूध सहज उपलब्ध होते. तसेच त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र पाश्चराईझ्ड दूधातील काही घटक अनेक आजारांना आमंत्रण देत असल्याने अमेरिका आणि कॅनडामध्ये या दूधावर बंदी घालण्यात आली आहे.
टॅग्स :foodअन्न