Have you heard of black diamond apples the rare dark fruits
बाबो! काळ्या रंगाचंही असतं सफरचंद, एकाची किंमत वाचून व्हाल हैराण! By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 3:12 PM1 / 6काळी द्राक्षे तुम्ही पाहिली असतील. कदाचित रोज सकाळी तुम्ही एक सफरचंदही खात असाल. डॉक्टरची हे फळ खाण्याचा सल्ला देतात. हेच जर तुम्हाला विचारलं की, तुम्ही किती रंगाचं सफरचंद खाल्लं? तर यावर कुणीही पटकन, लाल, हिरवं आणि हलकं पिवळ्या रंगाचं असं उत्तर मिळू शकतं. पण एक असंही सफरचंद आहे, जे तुम्ही कधी खाल्लंच नसेल. कारण हे जांभळ्या, हलक्या काळ्या रंगाचं सफरचंद फार दुर्मिळ आहे.2 / 6या सफरचंदला ब्लॅक डायमंड म्हटलं जातं. आणि या सफरचंदाचं तिबेटच्या डोंगरात उत्पादन घेतलं जातं. या प्रजातीला 'हुआ नियु' असं नाव आहे. या सफरचंदाच्या वेगळ्या जांभळ्या रंगाला तिबेटच्या नाइंग-चची परिसराची भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे. चीनची कंपनी Dandong Tianluo Sheng Nong E-Commerce Trade Co. ५० हेक्टर जमिनीवर याची शेती करते. हे शेत समुद्रसपाटीपासून ३१०० मीटर उंचीवर आहे. असे मानतात की, ही सफरचंदच्या शेतीसाठी सर्वात आदर्श जागा आहे3 / 6या ठिकाणावर तापमान दिवसा आणि रात्री फार वेगळं असतं. दिवसा भरपूर सूर्यप्रकाश आणि अल्ट्रा वॉयलट किरणे मिळतात. त्यामुळेच हे सफरचंद गर्द लाल आणि जांभळ्या रंगाचे दिसतात. 4 / 6या सफरचंदाचं उत्पादन फार कमी आहे. सामान्य सफरचंदाच्या एका झाडाला परिपक्व होण्यासाठी साधारण २ ते ५ वर्षांचा कालावधी लागतो. तेच ब्लॅक डायमंडच्या झाडांना ८ वर्षांचा कालावधी लागतो. त्यातही बागेतील केवळ ३० टक्केच झाडांना फळ येतात.5 / 6ब्लॅक डायमंडची शेती इतरांसाठी एकप्रकारे रहस्यासारखीच आहे. काही बाग मालकांचं मत आहे की, सफरचंद असं नसतंच. तर काहींच म्हणणं आहे की, सोशल मीडियात व्हायरल झालेले फोटो हे एडिट केलेले आहेत.6 / 6ब्लॅक डायमंडची शेती इतरांसाठी एकप्रकारे रहस्यासारखीच आहे. काही बाग मालकांचं मत आहे की, सफरचंद असं नसतंच. तर काहींच म्हणणं आहे की, सोशल मीडियात व्हायरल झालेले फोटो हे एडिट केलेले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications