शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आरोग्यासाठी ग्रीन टी किती फायदेशीर, खरंच वजन कमी होतं का? डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 16:56 IST

1 / 8
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. ग्रीन टी ही त्यापैकीच एक आहे. त्याचे आणखी बरेच आरोग्य फायदे आहेत. चेहऱ्यावरचा ग्लो वाढवण्यासाठी आणि वेट लॉससाठी याचा वापर करतात.
2 / 8
आयुर्वेदिक सल्लागार डॉ. आशिष गुप्ता म्हणतात की, दररोज एक कप ग्रीन टी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. विविध आरोग्य समस्यांवर प्रभावीपणे फायदेशीर ठरू शकते.
3 / 8
सामान्यतः ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी किंवा बेली फॅट कमी करण्यासाठी वापरली जाते परंतु याशिवाय ग्रीन टी अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. ग्रीन टीचे सेवन केल्याने हृदयरोगाचा धोका कमी होऊ शकतो.
4 / 8
बॉडी वेट मेंटेन कण्यासाठी आणि बेली फॅट कमी करण्यासाठी ग्रीन टी हा एक चांगला पर्याय असू शकतो असं डॉ. आशिष म्हणतात. ग्रीन टी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित ठेवते.
5 / 8
ग्रीन टीचं सेवन तुमच्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतं. त्वचा निरोगी होते, ग्लो येतो.
6 / 8
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रियेला गती देतात. ग्रीन टीमध्ये कार्ब्स, फॅट आणि साखरेचं प्रमाण नगण्य असतं, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका नसतो.
7 / 8
बहुतेक लोक फक्त ग्रीन टी पितात पण चवीनुसार त्यात काही गोष्टी मिसळता येतात. आलं, लिंबू, मध, तुळस, लवंग आणि वेलची इत्यादी गोष्टी मिसळून तुम्ही ग्रीन टीचं सेवन करू शकता.
8 / 8
ग्रीन टीमध्ये असलेले कॅफिन वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी फक्त ग्रीन टीवर पूर्णपणे अवलंबून राहणं योग्य नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम देखील आवश्यक आहे.
टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स