Health benefits of cucumber or kakadi helps in weight loss and hangover
उन्हाळ्यात भरपूर खा काकडी; वजन कमी करण्यासोबतच अनेक होतील फायदे By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 3:38 PM1 / 9काकडी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये निसर्गतः पाणी आणि शरीरासाठी आवश्यक पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात. जी मानवी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. युनाइटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चरने दिलेल्या माहितीनुसार, काकडीमध्ये पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. यामध्ये आयर्न, सोडियम, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी देखील असतं. 2 / 9जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर काकडी तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. काकडीमध्ये 95 टक्के पाणी असतं. जे शरीरातील मेटाबॉलिज्म मजबुत करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 3 / 9मद्यपान केल्यानंतर सकाळी होणारी डोकेदुखी दूर करण्यासाठी काकडी मदत करते. काकडीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन बी, शुगर, इलेक्ट्रोलाइट्स आणि पाणी असतं. 4 / 9जर काकडी सालीसकट खाल्ली तर त्यामुळे हाडांना फायदा होतो. काकडीच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणावर सिलिका असतं. जे हाडं मजबुत करण्यासाठी मदत करतं. तसेच यामध्ये अस्तित्वात असणारं कॅल्शिअम हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. 5 / 9जर तुम्ही श्वास घेताना किंवा बोलताना येणाऱ्या दुर्गंधामुळे वैतागले असाल तर काकडीचा एक तुकडा कापून जीभेच्या मदतीने वरच्या बाजूला थोडा वेळासाठी ठेवा. काकडीमधील पोषक तत्व तोंडामध्ये लाळेची निर्मिती वाडवतात आणि दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी मदत करतात. 6 / 9काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळ पोटातील उष्णता कमी करण्यासाठी काकडी अत्यंत फायदेशीर ठरते. काकडी चावून खाल्याने दात आणि हिरड्यांचं आरोग्य राखण्यासही मदत होते. 7 / 9 रोगप्रतिकार शक्ती मजबुत बनवण्यासाठी काकडी अत्यंत फायदेशीर ठरते. काकडीमद्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन यांसारखी अॅन्टीऑक्सिडंट तत्व असतात. जी शरीरामध्ये अस्तित्वात असलेली फ्री रॅडिकल्स दूर करतात. 8 / 9काकडीमध्ये असलेलं एस्कॉर्बिक अॅसिड आणि काही इतर पोषक घटक डोळ्यांमध्ये होणारी सूज कमी करण्यासाठी मदत करतात. काकडीचे काही स्लाइस कापून फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. एक-एक स्लाइस डोळ्यांवर ठेवा. 9 / 9काकडीमध्ये जास्त प्रमाणात पाणी आणि फायबर असतं. जे पाचनतंत्रातूनविषारी तत्व काढून टाकण्यासाठी मदत करतात. यामध्ये अस्तित्वात असलेलं एरॅपसिन एंजाइमही शरीरामध्ये पचनक्रियेसाठी फायदेशीर असतं. आणखी वाचा Subscribe to Notifications