शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वजन कमी करण्यासोबतच 'या' जीवघेण्या आजारापासून बचाव करतो भोपळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 10:54 AM

1 / 8
भोपळ्याचं नाव ऐकताच अनेक लोकं नाक-तोंड मुरडतात. कारण अनेकांना याची चव आवडत नाही. परंतु, भाजीव्यतिरिक्त अनेक पदार्थ तयार करण्यासाठी भोपळ्याचा वापर करण्यात येतो. भोपळा प्रामुख्याने गोड पदार्थ तयार करण्यासाठीही वापरण्यात येतो. भोपळ्यामध्ये पोटॅशिअम, बीटा कॅरोटिन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्व आढळून येतात. जाणून घेऊया भोपळ्याच्या आरोग्यदायी फायद्यांबाबत...
2 / 8
भोपळ्यमध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरी असतात. तसेच फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भोपळा अत्यंत फायदेशीर समजला जातो. ज्या व्यक्ती वाढणाऱ्या वजनामुळे त्रस्त असतील त्यांनी भोपळ्याच्या आपल्या डेली डाएटमध्ये समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
3 / 8
भोपळ्यामध्ये कॅरोटीनॉयड्स आणि झिंक मुबलक प्रमाणात असतं. जे कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि त्याचबरोबर प्रोस्टेट कॅन्सरपासूनही बचाव करतं.
4 / 8
डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी भोपळा फार मदत करतो. यामध्ये अस्तित्त्वात असलेलं बीटा-कॅरोटीनॉयड आणि ल्यूटिन डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं.
5 / 8
भोपळा स्किन हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतो. यामध्ये व्हिटॅमिन ई आणि सी असतं. जे एकत्र येऊन अॅन्टीऑक्सिडंट्सच्या रूपात काम करतात. तसेच स्किनचं सूर्याच्या घातक किरणांपासून बचाव करतात.
6 / 8
भोपळ्याव्यतिरिक्त भोपळ्याच्या बियाही अत्यंत फायदेशीर असतात. यामध्ये झिंक असंत, जे स्पर्म काउंट वाढवण्यासाठी मदत करतं. एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, भोपळ्याच्या बिया लिबिडोला बूस्ट करण्यासाठी मदत करतात. यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात. जे प्रोस्टाग्लॅडिन्स नावाचे हार्मोन्ससारखी तत्व अॅक्टिव्ह करण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरोनची कमतरता दूर करण्यासाठीही मदत करतात.
7 / 8
भोपळा गरोदर महिलांसाठी गुणकारी असतं. खासकरून त्याच्या बिया. भोपळ्याच्या बियांमध्ये नॉन हिम आयर्न असतं. जे आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या विकासासाठी मदत करतात.
8 / 8
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोग