Health Tips : Change your diet for mood swings and irritability
मूड स्विंग्स किंवा चिडचिडीने हैराण झालाय?; आहारातील 'हे' बदल करतील मदत By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 1:20 PM1 / 8महिलांना अनेकदा मूड स्विंग्सचा सामना करावा लागतो. मूड स्विंग्स होण्याला मूड डिसऑर्डर असेही म्हटलं जातं. अनेकदा चिडचिड किंवा तणाव, लहान-सहान गोष्टींवर रडणं, ऑफिस किंवा घरातील गोष्टींचं टेन्शन घेणं पहायला गेलं तर ही लक्षण साधारण समजली जातात. परंतु या लक्षणांनी जर गंभीर रूप धारण केलं तर मात्र पीडित व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता असते. महिलांना ही समस्या त्यांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळे होते. (Image Credit : Clearview Women's Center)2 / 8जर तुमच्यासोबचतही अशा गोष्टी होत असतील आणि त्यामुळे सतत तुमचा मूड चेंज होत असेल तर, तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्षं देण्याची गरज आहे. काह दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं की, मूड स्विंग्स किंवा तणाव योग्य आहार न घेतल्यानेही होतो. अशातच डाएटमध्ये बदल करा आणि मूड स्विंग्सच्या समस्येपासून सुटका करा. (Image credit : everydayhealth.com)3 / 8अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, भरपूर प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स असतात. तणाव किंवा डिप्रेशनने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी अंडी अत्यंत फायदेशीर ठरतात. 4 / 8मिडिअम चैन फॅटी अॅसिड नावाचं तत्व फक्त नारळामध्ये आढळून येतं. जे मेंदूचं आरोग्य राखण्यासोबतच मूडसाठीही फायदेशीर ठरतं. 5 / 8केळी म्हणजे, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमचा उत्तम स्त्रोत. नर्वस सिस्टिमसाठी केळी अत्यंत फायदेशीर ठरतात. यांमध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स बराच वेळ मूड ठिक ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. 6 / 8अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असतं. अक्रोड मेंदूमधील सेरोटोनिनचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. यामुळे फक्त मूड चांगला होत नाही तर, तुम्हाला शांत झोप मिळण्यासाठीही मदत होते. 7 / 8व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत असणारं लिंबू तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याचसोबत जर तुम्ही लिंबाचा आहारात समावेश केला तर आरोग्याच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत होते. 8 / 8टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. (Image Credit : womenschoiceaward.com) आणखी वाचा Subscribe to Notifications