Healthy Diet according to ayurveda for long life
आयुर्वेदानुसार, आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर औषधांपासून दूर राहाल By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 1:43 PM1 / 7आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ असे तीन दोष (एनर्जी) असतात. पित्त आग आणि पाणी, कफ पृथ्वी आणि जलाच्या दोषांना प्रदर्शित करतात. आपल्या सर्वांमध्ये ही एनर्जी वेगवेगल्या टाइप्समध्ये अस्तित्त्वा आहे. आयुर्वेदामध्ये सांगण्यात आल्यानुसार, प्रत्येक व्यक्तीमध्ये यांपैकी कोणत्या ना कोणता दोष प्रभावी असतो, जो बाकी दोन दोषांना संतुलित ठेवतो. आयुर्वेद एका सिम्पल सिद्धांतावर काम करतो. जर तुमच्या डाएटमध्ये गडबड असेल तर अनेकदा कोणत्याही औषधांचा परिणाम होत नाही. पण जर डाएट योग्य असेल तर कोणत्याही औषधांची गरज भासणार नाही. जर तुम्हाला आयुर्वेदानुसार, डाएट घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्या डाएटमध्ये या पदार्थांचा नक्की समावेश करा... जाणून घ्या हेल्दी पदार्थांबाबत... 2 / 7आयुर्वेदामध्ये तूपाला फार महत्त्व देण्यात येतं. बटर किंवा लोण्यापेक्षा पचण्यास हलकं असतं. त्यामुळे हे टॉक्सिन्स शरीरातून बाहेर टाकण्यासाठी मदत करतं. 3 / 7आयुर्वेदामध्ये अनेक ठिकाणी कोमट पाण्याचे फायदे वाचायला मिळतात. यामुळे शरीरातून हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यासोबतच त्वचेवरही ग्लो वाढण्यास मदत होते. त्यामुले प्रत्येक तासाला थोडं थोडं कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता भासत नाही आणि मेटाबॉलिज्म योग्य राहण्यास मदत होते. 4 / 7थंड दूधाच्या तुलनेमध्ये गरम दूध पचण्यास अत्यंत हलकं असतं. आयुर्वेदामध्ये कोमट दूधाचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. जर योग्य प्रमाणात दूध प्यायलं तर हे शरीरातील दोषांना बॅलेन्स करतं आणि शरीराला ऊर्जा देतं. 5 / 7जिऱ्याचा आहारात समावेश करण्यासाठी दोन पद्धती वापरण्यात येतात. पहिली म्हणजे, रात्रभर जिरं पाण्यामध्ये भिजवून अनोशापोटी याचं पाणी प्या. दुसरा म्हणजे, पाणी उकळून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर जिरं एकत्र करा. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. 6 / 7चहा असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेज, भारतामध्ये आल्याशिवाय जेवणाची चव अगदी फिकी असते. आयुर्वेदामध्ये आल्याला प्रत्येक समस्येवरील उपाय मानला जातो. हे अन्न पचवण्यासाठी मदत करतं तसेच महिलांना होणाऱ्या मासिक पाळीच्या वेदना दूर करण्यासाठीही मदत करतो. 7 / 7टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications