innovative maggi recipes like maggi spring rolls maggi cutlets or maggi burger recipe
बर्गर, टोस्ट आणि रोल : मॅगीपासून बनवा या 5 चविष्ट रेसिपी By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 3:02 PM1 / 51. मॅगी फ्राइज : आतापर्यंत तुम्ही बटाट्याचे किंवा रताळ्यांच्या फ्राईजची चव चाखली असेल. पण कधी मॅगीपासून बनवण्यात आलेले फ्राइज खाल्ले आहेत का?. नसेल तर एकदा तरी मॅगी फ्राइजची रेसपी करावी. वेगवेगळ्या भाज्यांसहीत मॅगी पाण्यामध्ये उकळावी. यानंतर यामध्ये चीज आणि हर्ब्स मिसळून ते तळावे आणि खावे. 2 / 52. मॅगी स्प्रिंग रोल : मॅगी स्प्रिंग रोलसाठी मॅगी, कोबी, गाजर आणि तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्यांचा समावेश करावा. स्प्रिंग रोल करताना यामध्ये मसाला आणि सॉसचा चवीसाठी वापर करावा. पोळीमध्ये मिश्रण भरल्यानंतर रोल तेलात तळावा. 3 / 53. मॅगी कटलेट : व्हेज कटलेटप्रमाणेच मॅगीचे कटलेट बनवावे. नाश्त्यासाठी हा नवीन पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो. यासाठी मॅगी मसाल्याचा वापर नक्की करावा. कुरकुरीत, लालसर होईपर्यंत कटलेट तेलात तळावे. नंतर चटणीसोबत मॅगी कटलेटचा स्वाद घ्यावा. 4 / 54. मॅगी नूडल्स टोस्ट : मॅगी तयार करताना नेहमी पेक्षा कमीतकमी पाणी घ्यावे. यानंतर एका पॅनमध्ये ब्रेड कुरकुरीत होईपर्यंत भाजावा. त्यावर सॉस लावावा आणि मग त्यावर बनवलेली मॅगी ठेवावी. हवे असल्याच चीजही टाकावे. यानंतर 30 सेकंदांसाठी ओव्हनमध्ये ठेवावा आणि टोस्टचा आस्वाद घ्यावा.5 / 55. मॅगी बर्गर : मॅगी ''बन''च्या शेपमध्ये डीप फ्राय करावी लागेल. या मॅगी बनमध्ये आपल्या आवडीच्या चटणी आणि चीज टाकावे आणि तयार झाल्यावर मॅगी बर्गर खावा. आणखी वाचा Subscribe to Notifications