शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इन्फेक्शन आणि आजारांचं टेंशन नकोय? तर साखरेऐवजी गुळाचं सेवन ठरेल इफेक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 4:23 PM

1 / 10
गुळाच्या सेवनाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत असतील. गुळ हा प्रत्येकाच्याच घरी असतो. साखरेचा वापर गुळापेक्षा अधिक होताना दिसून येतो. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे फायदे वाचून तुम्ही गुळाचा आहारात जास्त समावेश कराल. कराण सध्याच्या काळात जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असल्यामुळे या उपायाचा तुम्हाला नक्की फायदा होईल. श्वासांशी निगडीत समस्या गुळाच्या सेवनाने निर्माण होत नाहीत.
2 / 10
ज्या लोकांना सांधेदुखीची समस्या नेहमी होते, ते सुद्धा दूध आणि गुळाचं सेवन करू शकतात. दूध आणि गुळाच सेवन केल्याने सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. दुधात असलेल्या व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम आणि गुळात असलेल्या आयर्नमुळे सांधे मजबूत होण्यासही मदत मिळते. तुम्ही गुळाचा एक तुकडा आल्यासोबतही खाऊ शकता.
3 / 10
गूळ, रक्त स्वच्छ करून शरीरातील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. जसं ग्रीन टी शरीर डिटॉक्स करून वजन कमी करते तसचं गूळ शरीर डिटॉक्स करून वजन कमी करण्याचं काम करतो.
4 / 10
रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते. गुळाचा पॅक तयार करून तो पॅक सुध्दा तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. एक चमचा गुळात एक चमचा टॉमॅटोचा रस, अर्था चमचा लिंबाचा रस, आणि चिमूटभर हळद आणि ग्रीन टी मिसळून पॅक बनवून घ्या. आणि तो पॅक चेहऱ्याला लावा. या पॅकचा वापर केल्यास फरक दिसून येईल.
5 / 10
मासिकपाळी दरम्यान अनेकांना पोटदुखीच्या त्रासाने ग्रस्त असतात. ह्या त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. गुळ खाल्ल्याने पोट दुखीचा त्रास कमी होतो.
6 / 10
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गुळाच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं.
7 / 10
पोटासंबंधीच्या अनेक आजारांत गुळ खूप फायद्याचा ठरतो. गुळ खाल्ल्यामुळे मुळे आपले पचन तंत्र सुधारते. जेवल्यानंतर गुळ खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते.पोट साफ होत नसल्यास गुळाच्या सेवनाने फरक दिसून येतो.
8 / 10
गुळ हा केसांना दाट आणि सुंदर बनवण्यासाठी फायदेशीर ठरतो. केसांना लावण्यासाठी गुळात मुलतानी माती आणि दही तसेच पाणि मिसळून हेअर पॅक तयार करा. हा पॅक केस धुवायच्या एक तास आधी केसांना लावा. त्यानंतर केस धुवा. त्यामुळे केस चमकदार होतील. जसजसे वय वाढत जातं. तसतसे चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरूवात होते. गुळात अ‍ॅन्टी ऑक्सीडंटस असतात. जे चेहऱ्यावर येणाऱ्या फ्री रॅडीकल्सशी सामना करतात.
9 / 10
दम्याच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ऑक्सिजनची कमतरता आणि वाढत्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. अशावेळी त्यांच्या शरीरात उष्णता कायम राहावी व कफ बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी रोज दूध व गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
10 / 10
दम्याच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. ऑक्सिजनची कमतरता आणि वाढत्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. अशावेळी त्यांच्या शरीरात उष्णता कायम राहावी व कफ बाहेर पडण्यास मदत व्हावी यासाठी रोज दूध व गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य