शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फ्लॉवर ठरतो आरोग्यासाठी फायदेशीर; कॅन्सरपासून बचाव करण्यासोबतच इतरही फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 1:05 PM

1 / 7
आता जास्तीत जास्त लोक वेगन डाएटचा आधार घेताना दिसत आहेत. अशातच अनेकजण अशा काही भाज्यांच्या शोधात आहेत, ज्या चवीसोबतच पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असतात. या सर्व भाज्यांमध्ये फ्लॉवरची भाजी सर्वात उत्तम पर्याय आहे. जास्तीत जास्त लोक आहारामध्ये या भाजीचा समावेश करत आहेत. जाणून घेऊया फ्लॉवरच्या भाजीमध्ये असणाऱ्या पोषक तत्वांबाबत जी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. (Image Credit : espace-recettes.fr)
2 / 7
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लॉवरची भाजी पोषक तत्वांसोबत अनेक खनिज तत्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये विटॅमिन मुबलक प्रमाणात आहेत. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन-सी कोलेजन प्रॉडक्शन वाढवतं आणि इम्यूनिटी वाढवण्यासाठीही मदत करतं. (Image Credit : Natural Food Series)
3 / 7
फ्लॉवरमध्ये अस्तित्वात असलेलं व्हिटॅमिन के हाडांसाठी आणि शरीरातील रक्त वाढिसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं आणि यामध्ये असलेली फायटोन्यूट्रिएंट्स कॅन्सरच्या पेशी कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. (Image Credit : myvuenews.com)
4 / 7
फ्लॉवरच्या भाजीमध्ये फायबर्स, कोलीन (एक आवश्यक पोषक तत्व) आणि अॅन्टीऑक्सिडंट असतात. सर्वात मोठी गोष्ट अशी की, फ्लॉवर चवीला उत्तम असण्यासोबतच ते लो कार्बही असतं. (Image Credit : Everyday Health)
5 / 7
तुम्ही लो-कॅलरी डिशच्या स्वरूपातही हे खाऊ शकता. त्याव्यतिरिक्त सूप आणि सलाड म्हणूनही खाता येऊ शकतं. तेच कधी-कधी याच्या भजी तयार करूनही खाऊ शकता. चवीला अत्यंत टेस्टी लागतात. (Image Credit : Perfect Keto)
6 / 7
फ्लॉवर बेक करून मंच्यूरियन म्हणून किंवा भाजी, कटलेट यांसारख्या अनेक टेस्टी पदार्थांच्या स्वरूपात खाता येतं. तुम्ही हे पदार्थ तयार करण्यासाठी चीज वापरणार असाल तर त्याऐवजी कॉलीफ्लॉवर बेस्ड सॉस किंवा क्रीम वापरू शकता. (Image Credit : RDLounge.com)
7 / 7
जरी फ्लॉवरची भाजी अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असती तरी आठवड्यातून 3 ते 4 वेळाच खा. त्यापेक्षा जास्त खाणं शक्यतो टाळा. जास्त खाल्याने पोट फुगल्याप्रमाणे वाटते तसेच गॅसच्या समस्येचाही सामना करावा लागू शकतो. तसेच आधीपासूनच शरीराच्या समस्यांनी त्रस्त असाल तर डॉक्टरांच्या सल्यानेच याचा आहारामध्ये समावेश करा.
टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स