शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आश्चर्य! समोसा, जिलेबीसारखे 'हे' खाद्यपदार्थ भारतीय नाहीत तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 3:15 PM

1 / 10
समोसा, गुलाबजाम, जिलेबी हे खाद्यपदार्थ पाहिल्यावर प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. काही जण खाण्यासाठी जगतात तर काही जगण्यासाठी खातात. भारतातील सर्वच ठिकाणी मिळणारे हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच आवडतात. मात्र तुम्हाला माहितीय का? हे लोकप्रिय खाद्यपदार्थ भारतीय नाहीत. अशाच काही पदार्थांविषयी जाणून घेऊया.
2 / 10
समोसा हा प्रत्येकाच्याच आवडीचा खाद्यपदार्थ आहे. मात्र भारतातील अनेक ठिकाणी अगदी सहज मिळणारा समोसा हा भारतीय नसून तो मध्य पूर्व देशांमधून आला आहे. मध्य पूर्व देशांमध्ये 'सम्बोसा' या नावाने समोसा ओळखला जातो.
3 / 10
सण-समारंभामध्ये गुलाबजाम हा गोडपदार्थ असतो. मात्र गुलाबजाम हा फारसी देशांमधून आला आहे. फारसी देशांमध्ये गुलाबजामला 'लोकमा' आणि 'लुक्मत-अल-कादी' असं म्हटलं जातं.
4 / 10
वाफाळलेल्या चहासोबत अनेकांची सकाळ होते. मात्र प्रत्येक चहाच्या टपरीवर मिळणारी गरमागरम चहा ही भारतीय नसून ब्रिटनमधून आली आहे. मात्र भारतात आल्यावर चहा तयार करण्याची पद्धत आणि चव यामध्ये बदल झाला.
5 / 10
जिलेबी ही सगळ्यांच्याच आवडीची. लग्न समारंभात आवर्जून असणारी जिलेबी फारसी आणि अरब देशांमधून आल्याचं म्हटलं जातं.
6 / 10
नान हा प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणारा लोकप्रिय पदार्थ आहे. मात्र भारतीय वाटणारा नान हा खाद्यपदार्थ इराण आणि फारसी देशांमधून आला आहे.
7 / 10
बिर्यानी पाहिल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. भारतातील हैदराबादी बिर्याणी खूपच प्रसिद्ध आहे. मात्र बिर्याणी तुर्कचा पारंपरिक पदार्थ असून तुर्की व्यापाऱ्यांसोबत हा पदार्थ भारतात आला.
8 / 10
पंजाबी लोकांची आवडती डिश राजमा चावल आता सर्वांनाच आवडते. मात्र राजमा भारतीय नसून मेक्सिकोमधून आला आहे.
9 / 10
डाळ खिचडी ही आता प्रत्येकाच्याच आवडीची झाली आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या डाळ खिचडीची रेसिपी नेपाळमधून भारतात आली आहे.
10 / 10
नाश्तामध्ये प्रसिद्ध असलेली इडली साऊथ इंडियामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र इडली ही भारतीय नसून अरब देशातून जलमार्गाने भारतात आली आहे. त्यामुळेच साऊथ इंडियाच्या सागरी भागात ती सर्वात आधी लोकप्रिय झाली. त्यानंतर आता संपूर्ण भारतात इडली प्रसिद्ध आहे.
टॅग्स :foodअन्न