reasons you must eat pumpkins or kaddu or bhopla regularly
थंडीत आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करणं ठरतं फायदेशीर; जाणून घ्या फायदे! By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 10:41 AM1 / 5हिवाळा सुरू झाला की, शरीराला ऊब मिळेल अशा पदार्थांचा आहारामध्ये समावेश करण्यात येतो. त्याचप्रमाणे खोकला, सर्दी-खोकला आणि ताप यांसारख्या समस्याही उद्भवतात. या सर्व समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी भोपळा फायदेशीर ठरतो. हिवाळ्यामध्ये बाजारामध्ये भोपळा अगदी सहज मिळतो. यामध्ये व्हिटॅमिन-ए, कॅरोटीन, जँथिन आणि जॅक्सॅथिन यांसारखी पोषक तत्व आढळून येतात. अनेक आहार तज्ज्ञदेखील आहारामध्ये भोपळ्याचा समावेश करण्याचा सल्ला देतात. 2 / 5भोपळ्यामध्ये फोलेट अॅसिड मोठ्या प्रमाणावर असतं. जे आयर्न एसिमिलेशन आणि हिमोग्लोबिनचा स्तर व्यवस्थित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्याचसोबत हे चेहऱ्यावरील पिम्पल्स आणि केसांत झालेला कोंडा दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. 3 / 5भोपळा अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते. 4 / 5व्हिटॅमिन बी आणि बी6 सूज कमी करण्यासाठी आणि पीएमएसमध्ये होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी मदत करतात. 5 / 5भोपळ्याची भाजी किंवा सांबर तयार करून तुम्ही आहारामध्ये याचा समावेश करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications