These vegitables add in your diet in the summer
उन्हाळ्यामध्ये या भाज्या खाणं ठरतं फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 3:12 PM1 / 8उन्हाळ्यामध्ये खाण्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा उन्हाळ्यामध्ये लोक आजारी पडतात. कारण ते गरजेपेक्षा जास्त पदार्थांचं सेवन करतात. जास्त खाल्याने शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर वातावरणानुसार आहारातही बदल करणं गरजेचं असतं. वातावरणानुसार आहार घेतल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. म्हणून उन्हाळ्यामध्ये निसर्गतः थंड असलेल्या पदार्थांचे सेवन करणं फायदेशीर ठरतं. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या काही भाज्यांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या सेवनाने उन्हाळ्यात आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. 2 / 8बीटाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, हे आपण सारेच जाणतो. शरीरातील रक्ताची पातळी वाढविण्यासाठी बीट खाणं फायदेशीर ठरतं. बीट किडनी आणि पित्ताशयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतं. रात्री झोपण्याआधी जर एक ग्लास बीटाचा रस घेतला तर उन्हाळ्यात आरोग्य उत्तम राखण्यासाठी ते फायदेशीर ठरतं. बीट आरोग्यासोबत त्वचेचं आरोग्य राखण्यासाठीही गुणकारी ठरतं. 3 / 8आरोग्य उत्तम राखण्यासाठी पालेभाज्या अत्यंत उपयुक्त असतात. पालक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तसेच पालक निसर्गतः थंड गुणधर्म असतात. आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी पालकमद्ये असलेली पोषक तत्व मदत करतात. कच्ची पालक अत्यंत गुणकारी असते. याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. पालकमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न असतं. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी पालकचं सेवन करणं उत्तम ठरतं. 4 / 8पचनक्रियेशी संबंधित आजार शेवग्यामुळे नष्ट होतात. तसेत कावीळवरही शेवग्याच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. शेवग्याच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 5 / 8लहान मुलं अनेकदा घरातील जेवणापेक्षा जंक फूड खाण्याचा हट्ट धरतात. अशावेळी तुम्ही कोबीचा वापर करून चवीष्ट पदार्थ त्यांना खाण्यासाठी देऊ शकता. कोबीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 6 / 8 आयुर्वेदामध्येही तोंडलीचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगण्यात आले आहेत. तोंडलीची भाजी करण्यात येते. तोंडलीमध्ये कॅरोटीनव्यतिरिक्त प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमसारखे गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात. 7 / 8 दोडक्याची भाजी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. काही जणांना दोडक्याची भाजी खाण्यासाठी आवडत नाही. शावेळी तुम्ही दोडक्याची चटणी तयार करून खाऊ शकता. कावीळ झाल्यावरही दोडका अत्यंत फायदेशीर ठरतो. 8 / 8टिप : आम्ही वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. तसेच प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications