कोणत्या देशात भात सगळ्यात जास्त खाल्ला जातो? आकडेवारी वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 13:34 IST
1 / 7Most eating rice country: भात भारतातीलच नाही तर जगभरातील देशांच्या मुख्य जेवणाचा भाग आहे. अशात तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, कोणत्या देशात सगळ्यात जास्त भात खाल्ला जातो किंवा तांदळाचं सेवन केलं जातं? अनेकांना हेच वाटत असेल की, भारतात सगळ्यात जास्त भात खाल्ला जातो. पण असं नाहीये. 2 / 7भारतात जवळपास सगळ्याच राज्यांमध्ये भरपूर भात खाल्ला जातो. भारताप्रमाणेच जगातील अनेक देशांमध्येही तांदळाला फार डिमांड असते. यात चीन, बांगलादेशसहीत अनेक देशांचा समावेश आहे.3 / 7World Population Review च्या 2024 च्या रिपोर्टनुसार, जगात पश्चिम आफ्रिकेतील देश गाम्बियामध्ये सगळ्यात जास्त भात खाल्ला जातो. इथे २०२१ मध्ये प्रति व्यक्तीने 378.88 किलोग्रॅम भात खाल्ला आहे. 4 / 7गाम्बियानंतर तांदळाचा वापर किंवा भात खाण्याचं सगळ्यात जास्त प्रमाण ईस्ट आफ्रिकेतील देश कोमोरोसमध्ये आहे. कोमोरोसमध्ये प्रति व्यक्ती भाताचं सेवन 295 किलोग्रॅम प्रति वर्ष आहे.5 / 7भारताचा शेजारी देश भात खाण्यात अव्वल आहे. म्यांमारमध्ये भाताचं वर्षाला सेवन 270.8 किलोग्रॅम प्रति व्यक्ती आणि बांगलादेशमध्ये 263 किलोग्रॅम प्रति व्यक्ती आहे.6 / 7चीनमध्ये प्रति व्यक्ती 128.99 किलोग्रॅम भात वर्षभरात खाल्ला गेला. तेच भारतात वर्षभरात एका व्यक्तीने 104.29 किलोग्रॅम तांदळाचं किंवा भाताचं सेवन केलं.7 / 7भारताचा शेजारी देश पाकिस्तानबाबत सांगायचं तर इथे प्रति व्यक्ती वर्षाला केवळ 18.74 किलोग्रॅम भात खाल्ला जातो.