शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी, या 6 रानभाज्यांचा आस्वाद घ्याच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 9:16 PM

1 / 7
पावसाळ्यात जंगलात जागोजागी रानभाज्या उगवल्याचं चित्र असतं. मुरबाड, वसई, कर्जत, पालघर, सफाळेसह कोकणातल्या अनेक ठिकाणी या रानभाज्या आढळतात.
2 / 7
कुलुची भाजी- पावसाळ्याच्या पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानात अनेक ठिकाणी उगवते. त्यामुळे या दिवसांतून या भाजीची चव नक्कीच चाखायला मिळते.
3 / 7
करटोली- करटोली एक प्रकारची फळभाजी असून, ती पावसाळ्यात उगवते. ही भाजी कारल्यासारखी दिसते अन् कडूसुद्धा लागते. कारल्याची भाजीसारखीच करटोलीची भाजी करतात.
4 / 7
कुरडू- ही एक प्रकारच्या तणाची भाजी असतं. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रानोमाळ कुरडू जातीची पालेभाजी उगवते. कुरडूच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते.
5 / 7
टाकळ्याची भाजी- टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी असली तरी चविष्ट असते. रानोमाळ टाकळ्याची भाजी येत असून, गवताबरोबर पसरलेली दिसते, त्यात निवडून ती वेचावे लागते. ठाणे, मुंबईच्या बाजारात मेथीच्या जुडीसारखी ही भाजी विकत मिळते.
6 / 7
दिंडा- दिंडा भाजीला पावसाळ्यातील पहिल्याच पावसात कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्यापूर्वीच तिची कोंब खुडले जातात. दिंडाची भाजी खास प्रसिद्ध आहे.
7 / 7
भारंग- भारंग ही रानभाजी जमिनीतून वर आल्यानंतर कोवळी असतानाच तोडली जाते. भारंगच्या पानांच्या कडा करवतीसारख्या धारदार असतात. भारंगाची सुकी भाजी प्रसिद्ध आहे.