What happens if you eat daliya for breakfast every day, know the benefits
नाश्त्यात रोज दलिया खाल्ल्याने काय मिळतात फायदे? वाचाल तर रोज हेच खाल! By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 11:28 AM1 / 9Daliya Health Benefits: दलिया हे एक फार हेल्दी फूड मानलं जातं. लहान असो वा मोठे सगळ्यांना यातून भरपूर पोषक तत्व मिळतात. सकाळी नाश्त्यात जर तुम्ही दलियाचं सेवन केलं तर आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं. अशात जर तुम्ही एक महिना रोज नाश्त्यात दलियाचं सेवन केलं तर काय काय फायदे मिळतील हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 9दलियामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं. ज्यामुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. याने तुमची भूक कंट्रोल राहते आणि जास्त खाणंही टाळलं जातं. जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्यासाठी दलिया खूप फायदेशीर ठरतो. कारण यात कॅलरी कमी आणि पोषण भरपूर असतं. नियमितपणे दलियाचं सेवन कराल तर लवकर वजन कमी होईल. 3 / 9फायबर भरपूर असल्याने दलियामुळे पचन तंत्र मजबूत राहतं. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि सोबतच पोटही साफ होतं. जर तुम्ही रोज एक महिना दलियाचं सेवन कराल तर पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासही तुम्हाला मदत मिळेल. 4 / 9दलियामधील डायटरी फायबरने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते, ज्यामुळे हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. तसेच याने ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासही मदत मिळते. रोज दलियाचं सेवन कराल तर अनेक हृदयरोगांचा धोका कमी होईल, सोबतच हार्ट अटॅकचा धोका देखील कमी होईल. 5 / 9दलियामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांसाठी दलिया खूप फायदेशीर ठरतो. यातून शुगर हळूहळू रिलीज होते, ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढत नाही. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर एक महिना दलियाचं सेवन नियमितपणे करा. याने तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यास मदत मिळेल. 6 / 9दलियामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे तुमची इम्यूनिटी मजबूत करतात. यात व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, आयर्न आणि मॅग्नेशिअम असतं ज्याने शरीराची एनर्जी वाढते. अशात तुम्हाला वेगवेगळे आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव करण्यास मदत मिळते.7 / 9दलियामध्ये असलेल्या झिंक आणि बायोटिनने त्वचा व केसांना खूप फायदा मिळतो. हे तत्व त्वचा स्वच्छ आणि हेल्दी ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही एक महिना नियमितपणे दलियाचं सेवन केलं तर त्वचा चमकदार होईल आणि केसांची क्वालिटीही सुधारेल.8 / 9दलियाचं सेवन केल्याने शरीर डिटॉक्स करण्यासही मदत मिळते. याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि आतड्या आतून स्वच्छ होतात. रोज दलियाचं सेवन केल्याने तुमचं शरीर नॅचरल पद्धतीने स्वत:ला डिटॉक्स करते.9 / 9दलियामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअ आणि फॉस्फोरससारखे मिनरल्स असतात, हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. नियमितपणे दलियाचं सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होतील आणि हाडांसंबंधी अनेक समस्यांचा धोकाही कमी होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications