शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातला सर्वात महाग बर्गर, किंमत 63 हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 6:55 AM

1 / 5
जगातील सर्वात महागडा बर्गर टोक्यो येथील एका रेस्टॉरंटमध्ये विक्रीला आला आहे. याला Oak Door स्टीकहाऊसमध्ये काम करणारा शेफ पॅट्रिक शिनाडा यांनी तयार केलेला आहे. याला बनविण्यासाठी विशेष वस्तूंचा वापर केला गेला आहे. (All Image Credit : AFP)
2 / 5
जगातील सर्वात महागडा बर्गर जवळपास 63 हजार रुपयांमध्ये विक्री होत आहे. या बर्गरची विक्री येत्या जूनपर्यंत राहणार आहे. या बर्गरचे नाव गोल्डन जॉयंट बर्गर असं ठेवण्यात आलं आहे.
3 / 5
हा बर्गर बनविण्यासाठी बीफ स्लाइस, चीज, टॉमेटो आणि अन्य खाण्याच्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. मात्र सर्वात विशेष म्हणजे डस्टेड गोल्डपासून बनवलेला पाव, हा बर्गर फुटबॉल एवढ्या आकाराचा असून त्याचे वजन ३ किलो आहे. हा एक बर्गर ५ ते ६ जणांना पोटभर होणार आहे.
4 / 5
हा बर्गर 6 इंच रुंद आणि 10 इंच लांब आहे. मुख्य म्हणजे हा बर्गर जपान मध्ये प्रिन्स नारुहितो हा नवा सम्राट म्हणून कार्यभार स्वीकारत असून त्याच्या सन्मानार्थ हा बर्गर बनविला गेला आहे.
5 / 5
ज्या कोणाला हा बर्गर खायचा असेल त्यांना तीन दिवस आधी बुकींग करुन ऑर्डर द्यावी लागेल. त्यामुळे इतका महागडा हा बर्गर कोण खरेदी करतं हे आगामी काळात कळेलंच.
टॅग्स :Japanजपान