शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

#Bestof2018 : 'या' पदार्थांवर खवय्यांनी मारल्या उड्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 2:44 PM

1 / 7
नववर्षाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच या वर्षाचा निरोप घेताना संपूर्ण वर्षभरातील अनेक आठवणी ताज्या होत असतात. तसेच या वर्षी जगभरातील अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या आहेत. या सर्व आठवणी मनाच्या कोपऱ्या दडवून आपण नवीन वर्षाच्या नव्या जोमात सुरुवात करणार आहोत. अशातच ज्या पदार्थांनी 2018वर्षात देशासह संपूर्ण जगभरात आपला दबदबा मिळवला त्या पदार्थांबाबत आपण जाणून घेऊया...
2 / 7
फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात दाल पकवान या पदार्थाचा बोलबाल होता. खरं तर याचं संपूर्ण श्रेय आपण रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण या नवदाम्पत्याला दिलं पाहिजे. विचारात पडलात ना? अहो... या दोघांनी आपली लग्नगाठ नोव्हेंबर, 2018मध्ये इटलीतील लेक कोमो येथे बांधली. तिथे पाहुण्यांसाठी अनेक पदार्थांसोबत दाल पकवानही तयार करण्यात आलं होतं. त्यामुळे या पदार्थाला भारताबाहेरही लोकप्रियता मिळाली. हा पारंपारिक पदार्थ चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो.
3 / 7
भारतातील सर्वात लोकप्रिय पेय म्हणजे चहा. सकाळी उठल्याबरोबर चहाचा कप हातात नसेल तर अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. कोणतीही समस्या असली तरी ही लोकं चहा पिणं विसरत नाहीत. त्यातच गोष्ट जर तंदूरी चहाची असेल तर बात काही औरच. पुण्याच्या अमोल दिलीप राजदेवने हाताने तयार केलेला तंदूरी चहा भारतासोबतच संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.
4 / 7
बाहेरून आलेल्या या पदार्थाने आपल्या चवीमुळे भारतीयांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. परंतु ज्यावेळी प्रिंस हॅरीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यावेळी समोसा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय असल्याचे दिसून आले. एका चॅरिटी इव्हेंटमध्ये प्रिंस हॅरी समोसा आपल्या हातात घेऊन लपवत असल्याचे फोटोतून दिसून आले. बटाटा आणि मसाले यांचं स्टफिंग करून तयार करण्यात आलेला हा समोसा चवीलाही उत्तम असतो.
5 / 7
2018मध्ये गोल्डन मिल्क म्हणजेच हळदीचं दूध भारतात अगदी पूर्वपार चालत आलेला पदार्थ. आपल्याकडे छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार म्हणून हळदीच्या दूधाचं सेवन केलं जातं. पण 2018मध्ये हे दूध युनायटेड स्टेट्स आणि जगभरातील इतर देशांमध्येही पोहोचले.
6 / 7
फिल्टर कॉफी म्हणजे दक्षिण भारतातील सर्वा जुना पेय पदार्थ. आता ही कॉफी आंतराष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्ध होताना दिसत आहे. यासाठीही तुम्ही दीपिकाला थॅक्यू म्हटलं पाहिजे. कारण दीपिका लग्नासाठी ज्यावेळी इटलीमध्ये पोहोचली त्यावेळी फिल्टर कॉफी देऊन तिचं स्वागत करण्यात आलं होतं.
7 / 7
आपल्या देशातील घराघरांमध्ये जेवणात तूपाचा वापर करण्यात येतो. तूप हे शरीरासाठी फायदेशीर मानलं जात. तूपाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, हे लॅक्टोस फ्री असतं आणि पचनास हलक असतं. यामध्ये अस्तित्त्वात असणाऱ्या पोषक तत्वांमुळे डॉक्टर आणि न्युट्रिशनिस्ट आहारात तूपाचा समावेश करण्याचा सल्ला देतात. तूपाच्या या वैशिष्ट्यांमुळेच तूप संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.
टॅग्स :Best Of 2018बेस्ट ऑफ 2018Healthy Diet Planपौष्टिक आहारHealth Tipsहेल्थ टिप्स