तुम्हालाही डोसा आवडतो, पण तो उत्तर भारतात चांगला मिळतो की दक्षिण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:18 IST
1 / 8डोसा हा पदार्थ दक्षिण भारतीय, मात्र तुम्हाला कुणी प्रश्न विचारला की भारतात उत्तरेत डोसा चांगला मिळतो की दक्षिणेत, तर..? अशीच चर्चा गेल्या आठवड्यात सोशल मीडियात काही काळ रंगली. काहींचं म्हणणं दिल्लीत डोसा चांगला मिळतो, मग वाद अटळच!2 / 8हल्ली सर्व पदार्थ सर्वत्र मिळतात आणि ‘आमच्याच भागातले अमूक पदार्थ चांगले’ यावर लोक वाद घालतात. स्थानिक चवीचा आणि दुसरीकडे मिळणाऱ्या त्याच पदार्थाचा काही मेळ असेलच असं नाही.3 / 8या सगळ्याला ‘मायग्रेटेड फूड’ असाही एक शब्द आहे. पण अन्नाचा प्रवास माणसांसोबत पिढ्यांन् पिढ्या होतोच आहे..4 / 8त्यात अजून परिणामकारक घटक असतात ते म्हणजे माध्यमं आणि बाजारपेठ. माणसांचे अन्न प्राधान्यक्रम अनेक गोष्टींमुळे बदलतात. मराठी लग्नात सर्रास पनिरच्या भाज्या आणि दाल मखनी दिसू लागले.5 / 8चायनीजचे स्टॉल लागू लागले. मोमो तर आता सर्व शहरांत मिळतात. नूडल्स मिळतात. उकडीचे मोदक देशभर प्रसिद्ध होतात. मुंबईचा वडापाव पाकिस्तानात मिळतो आणि त्याचे रिल्स व्हायरल होतात. हल्लीचा एक नवा प्रकार म्हणजे फ्यूजन फूड. दोन सर्वस्वी वेगळ्याच भागातले पदार्थ एकत्र येऊन भलताच पदार्थ तयार होतो.6 / 8उत्तरेतलं पनीर, चिनी पदार्थातली शेजवान चटणी आणि दक्षिणी डोसा असं मिळून पनीर शेजवान डोसाही आता मिळतो आणि तो आता अनेकांना आवडतोही.7 / 8जगभरात हे घडतं. काहींचा फ्यूजन फूडला विरोधच आहे. त्यामुळे अस्सल चव जाते अशी तक्रार. पण खाद्यपदार्थही माणसांप्रमाणेच बदलतात आणि नव्या चवींचा स्वीकार करता करता नव्या पदार्थांचाही स्वीकार माणसं करतात. त्यामुळे स्थानिक पदार्थच गायब होतात. उदा. मराठी लग्नात असायचे ते पदार्थ आज अनेक लग्नात दिसत नाहीत.8 / 8या प्रश्नावर चर्चा होऊच शकते. जगभर होते आहे. पण ज्याला जे आवडतं, ज्याची जशी ऐपत तशी खाद्यनिवड माणसं करतात हे खरंच!