CoronaVIrus : Football Fan Got Out Of Match In Greece In Lockdown rkp
CoronaVirus : लॉकडाऊन नियमांचं केलं उल्लंघन, मिळालं मॅचच तिकीट By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 4:31 PM1 / 8जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेसह जगभरात १६ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 2 / 8कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत आहे.3 / 8यातच यूनानमधील फूटबॉल क्लब एईके एथेंसचा एक चाहता देशातील लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत घराबाहेर पडला. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील प्रशासनाने त्याचावर कारवाई केली आणि त्याला दंड भरावा लागला.4 / 8जवळपास ६० वर्षीय हा चाहता एथेंसच्या उपनगरातील निया फिलाडेलफियाजवळ टीमचे नवीन स्टेडियम बांधकाम पाहण्यासाठी जात होता. 5 / 8लॉकडाऊन दरम्यान या चाहत्याजवळ घराबाहेर जाण्यासाठी लागणारा पास नव्हता. त्यामुळे त्याला १५० रुपयांचा दंड भरावा लागला. 6 / 8एथेंस टीमचे मालक दिमत्रिस मेलिस्सानिदिस यांना या चाहत्यासंदर्भात समजले. त्यानंतर त्यांनी चाहत्याला दंडाची रक्कम देण्यासोबत पुढील सामन्याचे तिकीट देण्याचे निर्देश क्लबला दिले आहेत.7 / 8टीमकडून जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, 'आम्ही घरात आहोत, निरोगी आहोत. ज्यावेळी आम्ही या स्थितीतून बाहेर येऊ, त्यावेळी आमचे नवीन स्टेडियम आमची वाट पाहत असेल.'8 / 8दरम्यान, यूनानमध्ये अनेक लोकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली असून जवळपास ९० लोकांचा मृत्यू झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications