Cristiano Ronaldo and number seven, what is special?
ख्रिस्तियानो रोनाल्डो अन् नंबर सात, काय आहे खास बात? By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 11:56 AM1 / 10ख्रिस्तियानो रोनाल्डो... फुटबॉल विश्वातील सम्राट... त्याच्या 7 क्रमांकाच्या जर्सीनं अनेकांना वेड लावलं... या 7 नंबरमुळे त्यानं स्वतःचं एक वेगळंच CR7 हे ब्रँड तयार केलं आणि आज तो आंतरराष्ट्रीय ब्रँड झाला आहे. मँचेस्ट युनायटेड, रेयाल माद्रिद आणि आता युव्हेंटस क्लब, रोनाल्डोचं 7 नंबरशी जोडलेलं नातं आजही कायम आहे. 7 क्रमांकाची जर्सी सोडून तो अन्य कोणत्या क्रमांकासह खेळताना क्वचितच दिसला असेल. 33 वर्षीय रोनोल्डो जेव्हा युव्हेंटसमध्ये दाखल झाला त्यावेळी त्याच्यासाठी ज्युआन क्युड्राडोनं 7 नंबरची जर्सी सोडली आणि आता युव्हेंटसकडून रोनाल्डो 7 नंबरची जर्सी घालून खेळतोय...2 / 10मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये दाखल होण्यापूर्वी रोनाल्डो स्पोर्टिंग लिस्बनकडून 28 क्रमांकाची जर्सी घालून खेळत होता. 2004 साली तो मँचेस्टर युनायटेड येथे दाखल झाला आणि त्यानं 28 क्रमांकाच्या जर्सीसाठी मागणी केली होती, पण...3 / 10युनायटेडचे महान प्रशिक्षक सर अॅलेक्स फर्ग्युसन यांनी त्याला 7 क्रमांकाची जर्सी घालण्यास सांगितले. 7 क्रमांकाची जर्सी घालून यशस्वी झालेल्या महान खेळाडूंच्या पंक्तीत रोनाल्डोही स्थान पटकावेल असा त्यांना विश्वास होता. 4 / 10रोनाल्डोनं त्यानंतर इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये धमाकेदार कामगिरी केली. त्याने पहिल्याच सत्रात 42 गोल्स केले आणि 2008 मध्ये त्यानं पहिला बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकला. 5 / 10रेयाल माद्रिदकडून 2009 मध्ये त्याने पदार्पण केले, परंतु त्याला सुरुवातीला 9 क्रमांकाच्या जर्सीसह खेळावे लागले. कारण माद्रिदचा दिग्गज रॉल याच्याकडे 7 क्रमांकाची जर्सी होती. 2010 मध्ये त्यानं रोनाल्डोला ती सुपूर्द केली.6 / 10रॉलनं दाखवलेल्या विश्वासावर रोनाल्डो खरा उतरला.. माद्रिद सोबतच्या नऊ वर्षांच्या प्रवासात रोनाल्डोनं अनेक विक्रम मोडली आणि क्लबकडून सर्वाधिक गोल करण्याचा मान त्यानं पटकावला.7 / 10ओल्ड ट्रॅफर्डनंतर रोनाल्डो आणि 7 नंबर हे समिकरण घट्ट बनलं होतं. त्यामुळे युव्हेंटस क्लबनेही त्याच्यासाठी 7 क्रमांकाचीच जर्सी तयार केली. इटलीच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्येही 7 क्रमांकाच्या जर्सीला महत्त्वाचे स्थान आहे. 8 / 10हॅसन सॅलिहामिझीच आणि जिनल्युका पेसोटो या दिग्गजांसह अँजेली डी लिव्हिओही 7 क्रमांकाची जर्सी परिधान करत असे. फ्रान्सचे वर्ल्ड कप विजेते प्रशिक्षक डिडीयर डेश्चॅम्प हेही क्लबकडून 7 क्रमांकाची जर्सी घालायचे. 9 / 10पोर्तुगाल संघाकडूनही रोनाल्डो 7 क्रमांकाचीच जर्सी परिधान करतो. सुरुवातीला तो राष्ट्रीय संघाकडून 17 क्रमांकाची जर्सी घालायचा, परंतु दिग्गज खेळाडू लुईस फिगो निवृत्त झाल्यानंतर रोनाल्डोला 7 क्रमांकाची जर्सी देण्यात आली. 10 / 10फुटबॉल विश्वात 7 हा क्रमांक लक आणि यश यांचे प्रतिक मानला जातो, त्यामुळेच विशेष करून आक्रमकपटूंना 7 क्रमांकाची जर्सी दिली जाते आणखी वाचा Subscribe to Notifications