शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोनाल्डोचा गोल 'धडाका'; मेस्सीवर पुन्हा कुरघोडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 12:47 PM

1 / 7
ख्रिस्तियानो रोनाल्डोनं बुधवारी मध्यरात्री युरो 2020च्या पात्रता स्पर्धेत गोलधडाका लावला. लिथूनियाविरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोनं 4 गोल करताना पुन्हा एकदा कट्टर प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीवर कुरघोडी केली.
2 / 7
34 वर्षीय रोनाल्डोच्या या चार गोलमुळे पोर्तुगाल संघाने 5-1 असा दणदणीत विजय मिळवला. या कामगिरीसह रोनाल्डोनं आपल्या आंतरराष्ट्रीय गोल्सची संख्या 93 अशी केली आहे. या क्रमवारीत इराणचे दिग्गद अली डाएई 109 गुणांसह अव्वल स्थानी आहेत.
3 / 7
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल्सचा विक्रम नावावर करण्यासाठी रोनाल्डोला केवळ 16 गोल्स हवे आहेत. रोनाल्डोच्या या कामगिरीमुळे पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळाडू कोण, मेस्सी की रोनाल्डो? अशी चर्चा सुरू झाली आहे.
4 / 7
रोनाल्डो सध्या युव्हेंटस क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे. क्लब आणि देश यांच्यासाठी एका सामन्यात सर्वाधिक 3 किंवा त्यापेक्षा अधिक गोल करणाऱ्या विक्रमात रोनाल्डो आघाडीवर आहे. त्यानं 54 वेळा अशी कामगिरी केली आहे, तर मेस्सीला 51 वेळाच हा पल्ला पार करता आला.
5 / 7
एका सामन्यात 4 पेक्षा अधिक गोल करण्याच्या बाबतीतही रोनाल्डो आघाडीवर आहे. त्यानं 10 वेळा, तर मेस्सीनं 6 वेळा एका सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक गोल केले आहेत.
6 / 7
रोनाल्डोनं 37 प्रतिस्पर्धींविरुद्ध एकाच सामन्यात 3 किंवा त्यापेक्षा अधिक गोल करण्याचा पराक्रम केला आहे. या बाबतीतही मेस्सी ( 32) पिछाडीवर आहे.
7 / 7
युरोपियन क्वालिफायर सामन्यात सर्वाधिक गोल्सचा विक्रमही रोनाल्डोनं नावावर केला आहे. त्यानं आयर्लंडच्या रॉबी किनच्या 23 गोल्सचा विक्रम मोडला. या सामन्यापूर्वी रोनाल्डोच्या खात्यात 20 गोल्स होते आणि आता ती संख्या 24 अशी झाली आहे.
टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सी