शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रोनाल्डोला लगीनघाई; जाणून घ्या त्याच्या होणाऱ्या बायकोबाबत बरंच काही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 14:13 IST

1 / 10
दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो लवकरच लग्न करणार आहे. 34 वर्षीय फुटबॉलपटू तीन वर्षांपासून 25 वर्षीय जॉर्जिना रॉड्रीगेजला डेट करत आहे. या दोघांनी लवकर लग्न करावे अशी इच्छा रोनाल्डोची आई मारीया डोलोरेस डॉस सांतोस अव्हेइरो यांनी व्यक्त केली आहे.
2 / 10
स्पेनच्या जाका शहरातील जॉर्जिनाचा जन्म... जॉर्जिनाची आई स्पेनची आहे, तर वडील अर्जेंटिनाचे...
3 / 10
लंडनमध्ये शिक्षण घेणाऱ्या जॉर्जिना मॉडलिंग क्षेत्रात येण्यापूर्वी डान्स शिकायची...
4 / 10
जॉर्जिनाच्या वडिलांना अमली पदार्थच्या तस्करी प्रकरणी दहा वर्षांचा कारावास झाला होता...
5 / 10
2016मध्ये रोनाल्डोसोबत अनेकदा डेटवर दिसल्यानं ती चर्चेत आली.
6 / 10
नोव्हेंबर 2016मध्ये पॅरीस येथील डिजनीलँड येथे रोनाल्डो व जॉर्जिना यांना प्रथम एकत्र पाहिले गेले होते. त्यानंतर हे कपल अनेकदा पब्लिक प्लेसमध्ये फिरताना दिसले.
7 / 10
रोनाल्डोची प्रेयसी ही ओळख बनण्यापूर्वी जॉर्जिना ही माद्रिद येथे ज्युसी स्टोरमध्ये सेल्स असिस्टन्स म्हणून काम करायची...
8 / 10
त्या स्टोरमध्येच रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्यात नजरानजर झाली आणि पाहता क्षणीच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.
9 / 10
नोव्हेंबर 2017मध्ये जॉर्जिनानं सुंदर मुलीला जन्म दिला. रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्या मुलीचे नाव अॅलेना मार्टिना असे आहे. अॅलेना व्यतिरिक्त या रोनाल्डोची तीन मुलं आहेत..
10 / 10
नोव्हेंबर 2017मध्ये जॉर्जिनानं सुंदर मुलीला जन्म दिला. रोनाल्डो अन् जॉर्जिना यांच्या मुलीचे नाव अॅलेना मार्टिना असे आहे. अॅलेना व्यतिरिक्त या रोनाल्डोची तीन मुलं आहेत..
टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलPortugalपोर्तुगाल