शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coca Colaच्या 3000 कोटींच्या नुकसानाला जबाबदार ठरलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनं आता विराट कोहलीलाही दिला धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 4:54 PM

1 / 10
पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Portuguese football Cristiano Ronaldo) याचं नाव सध्या कोका कोला कंपनीला जवळपास 3000 कोटींच्या बसलेल्या नुकसानामुळे चर्चेत आहे.
2 / 10
यूरो फुटबॉल स्पर्धेच्या हंगेरी संघाविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी रोनाल्डोनं पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या दोन बॉटल्स हटवल्या अन् शेअर मार्केटमध्ये कोका कोलाला 4 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. आता रोनाल्डोनं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यालाही धक्का दिला आहे.
3 / 10
मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि सध्याचा क्लब युव्हेंटसकडून खेळताना रोनाल्डोनं फुटबॉलच्या मैदानावर अऩेक विक्रम केले. नुकतंच त्यानं यूरो 2020स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दोन गोल करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली.
4 / 10
पाच युरो स्पर्धा खेळणारा तो जगातील एकमेव फुटबॉलपटू आहेच, शिवाय आता यूरो स्पर्धेत सर्वाधिक 11 गोल्स करणारा खेळाडूचा विक्रमही त्यानं नावावर केला आहे. त्यानं मिचेल प्लाटीनी यांचा 9 गोल्सचा विक्रम मोडला. रोनाल्डोनं पोर्तुगालसाठी 106 गोल्स केले आहेत.
5 / 10
इंस्टाग्रामवर सर्वाधिक 300 मिलियन फॉलोअर्स असलेला रोनाल्डो हा जगातील पहिला सेलिब्रेटी ठरला आहे. इंस्टावर 200 मिलियन फॉलोअर्स असलेलाही तो पहिलाच व्यक्ती होता. ( Portuguese football Cristiano Ronaldo creates history by becoming the first person in the world to reach the 300 million followers mark on Instagram)
6 / 10
मैदानावरील विक्रमांमुळेही सोशल मीडियावरील त्याची लोकप्रियता तुफान वाढली आहे. त्यामुळेच त्याचे इंस्टाग्रामवर 300 मिलियन म्हणजेच 30 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. या लोकप्रियतेत दी रॉक ड्वेन जॉन्सन 246 मिलियनसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
7 / 10
त्यानं 50.3 मिलियन डॉलर इतकी कमाई केली होती आणि त्याला युव्हेंटस क्लबकडून मिळणाऱ्या पगारापेक्षा ( 33 मिलियन डॉलर) ती कमाई अधिक होती. फेसबूक, इंस्टाग्राम व ट्विटर या सोशल मीडियावर रोनाल्डोचे एकूण 500 मिलियन फॉलोअर्स आहेत.
8 / 10
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. तो वर्षाला 123 कोटी 61,06,601 इतके कमावतो. त्याला एका पोस्टमागे 2 कोटी 20,59,748 इतके मिळतात.
9 / 10
इस्टाग्रमावर १०० मिलियन म्हणजेच १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा विराटनं पार केला आणि १० कोटी इस्टा फॉलोअर्स असलेला तो पहिला भारतीय आणि आशियाई सेलिब्रेटी आहे. जगभरातील क्रिकेटपटूंमध्ये कुणाचेही इतके फॉलोअर्स नाहीत. विराट कोहलीच्या या विक्रमाचं ICCनंही कौतुक केलं होतं.
10 / 10
टॉप टेन खेळाडूंमध्ये फॉलोअर्सच्या बाबतीत रोनाल्डोनं प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी, नेयमार यांच्यासह विराट कोहलीलाही धक्का दिला आहे.
टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोVirat Kohliविराट कोहलीInstagramइन्स्टाग्राम