Euro 2020: Coca Cola reportedly suffers heavy losses after Cristiano Ronaldo moving bottles incident
Euro 2020, Coca Cola : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'त्या' कृतीमुळे शेअर बाजार गडगडला, Coca Colaला ४ अब्ज डॉलर्सचा फटका बसला! By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:39 AM1 / 11Euro 2020, Cristiano Ronaldo : गतविजेत्या पोर्तुगाल संघानं यूरो 2020त विजयाने सुरुवात केली. पोर्तुगालनं कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या दोन गोलच्या जोरावर हंगरी संघावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या रोनाल्डोनं वर्ल्ड रेकॉर्डची नोदं केली. 2 / 11पाच युरोपियन चॅम्पियनशीप खेळणारा तो जगातील पहिलाच खेळाडू बनला आणि त्यानंतर सामन्यात दोन गोल करून त्यानं यूरो स्पर्धेत सर्वाधिक 11 गोल्सचा विक्रमही नावावर केला. त्यानं मिचेल प्लाटिनी यांचा 9 गोल्सचा विक्रम मोडला. 3 / 11पहिल्या सत्रात रोनाल्डोनं गोल करण्याच्या दोन सोप्या संधी गमावल्या, 84व्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले होते. बोरुसिया डोर्टमंड क्लबकडून खेळणाऱ्या राफेल गुरेईरोनं हंगरी संघाची बचावफळी भेदली अन् 84व्या मिनिटाला पोर्तुगालचे गोलखाते उघडले.4 / 11 त्यानंतर तीन मिनिटांत मिळालेल्या पेनल्टीवर रोनाल्डोनं गोल करून ही आघाडी 2-0 अशी मजबूत केली. भरपाई वेळेत रोनाल्डोनं अप्रतिम गोल करून पोर्तुगालच्या विजयावर 3-0 असा शिक्का मारला. पण, या सामन्यापूर्वी रोनाल्डोनं केलेल्या एका कृतीचा Coca Cola कंपनीला मोठा फटका बसला.5 / 11पोर्तुगाल संघाचा कर्णधार अन् जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो Euro 2020 स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वीच चर्चेत आला होता. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी कॉन्फरन्स रूममध्ये दाखल होताच टेबलवरील कोका कोलाच्या बॉटल पाहून रोनाल्डो थोडाला नाराज दिसला. 6 / 11त्यानं खूर्चीवर बसताच कोका कोला च्या दोन्ही बॉटल्स खाली ठेवल्या. त्यानंतर त्यानं उपस्थित पत्रकारांना पाणी पिण्याचा सल्ला दिला. कोका कोला हे यूरो 2020 स्पर्धेचे प्रायोजक आहेत, परंतु रोनाल्डोनं त्याची पर्वा केली नाही. रोनाल्डो कधीच सॉफ्ट ड्रींक्स घेत नाही किंवा त्याची जाहीरातही करत नाही.7 / 11पण, रोनाल्डोच्या या कृतीनं पोर्तुगालचे मुख्य प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांच्यासह सर्वांना चकित केलं. 8 / 11रोनाल्डो हा फिटनेसच्या बाबतीत किती सतर्क आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच वयाच्या 36व्या वर्षीही तो मैदानावर युवा खेळाडूंप्रमाणे खेळ करू शकतो. तो दिवसाला सहा वेळा जेवतो, त्यात फळ, भाज्या आणि प्रोटीन यांचा समावेश असतो. त्याशिवाय तो कसून सरावही करतो.9 / 112020च्या एका पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोनं त्याच्या मुलाला सॉफ्ट ड्रींक्स पिताना व चिप्स खाताना पाहिले होते आणि त्यानंतर त्यानं नाराजी व्यक्त केली होती. 10 / 11आता रोनाल्डोनं Coca Cola च्या दोन बॉटल्स हलवल्या अन् दुसरीकडे शेअर बाजारही गडगडला. रोनाल्डोच्या त्या कृतीनं Coca Colaचे स्टॉक्स 1.6% टक्क्यांनी कोसळून ते 242 बिलियन अमेरिकन डॉलरवरून 238 बिलियन अमेरिकन डॉलरवर आले. 11 / 11कोका कोला कंपनीला 4 बिलियन अमेरिकन डॉलरचा फटका बसला... भारतीय रक्कमेत सांगायचे तर हे नुकसान 2,93,27,80,00,000 इतके मोठे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications