FIFA U-17 Women's World Cup, to be held in India this year, postponed due to Coronavirus svg
Big Breaking : कोरोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 12:13 PM1 / 11कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा, चॅम्पियन्स लीग, सीरि ए इटालियन लीग आदी महत्त्वाच्या फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.2 / 11इंडिंयन प्रीमिअर लीग ( आयपीएल) 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली असली तरी एप्रिल-मे मध्ये ती खेळवण्यात येईल याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरचा पर्यायाची चाचपणी सुरू आहे.3 / 11टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धाही एक वर्षानं पुढे ढकलण्यात आली असून ती 2021मध्ये जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे. त्यानंतर पॅरालिम्पिक स्पर्धाही होतील.4 / 11या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती. 5 / 11आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) याबाबत महत्त्वाची बैठकही बोलावली होती आणि त्यावर याविषयी चर्चा झाल्याचे कळते.6 / 11ऑस्ट्रेलियात ऑक्टोबरमध्ये पुरुषांची ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. पण, त्यावर अनिश्चिततेचं सावट आहे.7 / 11ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा रद्द झाल्यात ती थेट 2022मध्ये घेण्यात येईल असा प्रस्तावही समोर आला आहे, कारण 2021च्या स्पर्धेचं यजमानपद भारताला देण्यात आले आहे.8 / 11त्यात शनिवारी एक मोठी बातमी समोर आली. 9 / 11भारतात येत्या नोव्हेंबरमध्ये होणारी 17 वर्षांखालील मुलींची फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.10 / 112 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार होती. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली येऊन नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 11 / 11युरो 2020 आणि टोक्यो ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्यामुळे आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही संकट आले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications