FIFA World Cup 2018 : स्टार खेळाडू रोनाल्डोच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 17:47 IST
1 / 12रशियामध्ये फिफा वर्ल्ड कपला जोरदार सुरुवात झाली असून सध्या सगळीकडेच फुटबॉल फिव्हर बघायला मिळत आहे. फुटबॉल म्हटलं की सर्वातआधी रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांची सर्वांना आठवण होते. या दोघांकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. कारण दोघेही स्टार खेळाडू आहेत. दोघांचीही लोकप्रियता अफाट आहे. आज आपण पोर्तुगाल टीमचा कर्णधार रोनाल्डोबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. 2 / 121) फारच कमी लोकांना माहीत आहे की, रोनाल्डो म्हणून लोकप्रिय असलेल्या या खेळाडूचं पूर्ण नाव Cristiano Ronaldo dos Santos Aveiro असं आहे. 3 / 122) रोनाल्डोच्या टी-शर्टचा नंबर 7 आहे त्यामुळे हा नंबर लकी असल्याचं त्याचे चाहते मानतात. 4 / 123) रोनाल्डोचं नाव अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या नावावरुन प्रेरित आहे. 5 / 124) रोनाल्डोचे वडील जोस डिनिस एवियरो हे एक सरकारी माळी होते. 6 / 125) रोनाल्डोच्या वडिलांचा मृत्यू जास्त मद्य सेवन केल्याने झाला होता. त्यामुळे रोनाल्डो हा नशा करत नाही. 7 / 127) एलेक्स फर्ग्युसनने रोनाल्डोला मिळवण्यासाठी 17 मिलियन डॉलर दिले होते. त्यावेळी रोनाल्डो केवळ 17 वर्षांचा होता. 8 / 128) रोनाल्डो हा पोर्तुगालच्या नॅशनल टीमचा कर्णधार आहे आणि तो रिअल माद्रीदसाठीही खेळतो. 9 / 129) रोनाल्डोच्या किकचा वेग साधारण 130 किमी प्रति तास इतका आहे. 10 / 1210) रोनाल्डो हा बालपणापासूनच चिडखोर स्वभावाचा आहे. शाळेत असताना त्याने एका शिक्षकावर खुर्ची फेकली होती म्हणून त्याला शाळेतून काढण्यात आले होते. 11 / 1212) रोनाल्डोने आतापर्यंत 500 पेक्षा जास्त गोल केले आहेत. यात क्लब आणि देश-विदेशातील सामन्यात केलेल्या गोल्सचा समावेश आहे.12 / 1211) रोनाल्डो हा जगातला सर्वात महागडा खेळाडू असून त्याची वर्षाची कमाई 5 कोटी डॉलर इतकी आहे.