FIFA World Cup 2018: Messi's fan made in India 'House of Argentina'
FIFA World Cup 2018 : भारतातल्या मेस्सीच्या चाहत्यानं घराला बनवलं 'अर्जेंटिना हाऊस' By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 11:03 PM1 / 8रशियामध्ये 21व्या फिफा विश्वचषकाची सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक उरले असतानाच भारतातील फुटबॉल प्रेमींमध्येही प्रचंड उत्साह संचारला आहे. 2 / 8कोलकातातला एक फुटबॉल प्रेमी शिवशंकर पात्रानं स्वतःच्या घराला अर्जेंटिना हाऊस बनवून टाकलं आहे. 3 / 8शिवशंकर पात्रा हे एक चहावाले असून, फुटबॉलपटू स्टार लियोनेल मेस्सीचे जबरा फॅन आहेत. 4 / 8दर चार वर्षांनी जेव्हा फिफा वर्ल्ड कप होतो, त्यावेळी पात्रा स्वतःच्या तीन मजल्यांचं घर आणि दुकानाला निळ्या आणि पांढ-या रंगात रंगवून टाकतो. 5 / 8रशियाला जाण्यासाठी त्यांनी 60 हजार रुपये जमवले होते.6 / 8परंतु रशियाला जाण्यास 60 हजार रुपये पर्याप्त नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःच्या तीन मजल्यांच्या घराला अर्जेटिंना हाऊस बनवून टाकलं. 7 / 8कोलकात्यामधील परगणा जिल्ह्यातल्या ईछापूर रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर कोणालाही अर्जेंटिना चहाचं दुकान विचारल्यास तुम्हाला कोणीही तिकडचा मार्ग सांगेल. 8 / 8पात्रा हे मेस्सीची स्वाक्षरी असलेल्या 100 जर्सीही लहानग्यांना वाटणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications