शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fifa World Cup 2022 : बाबो! गर्लफ्रेंड्ससाठी 'पाण्या'सारखा पैसा; इंग्लंडच्या फुटबॉलपटूंनी बुक केलं ९६८९ कोटींचं हॉटेल, Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 5:13 PM

1 / 8
Fifa World Cup 2022 : जगातली सर्वात मोठी स्पर्धा फुटबॉल वर्ल्ड कप अवघ्या चार दिवसांवर आली आहे. कतार येथे प्रथमच फुटबॉल वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे आणि हळुहळू संघाचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. कतारला वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद देण्यावरून आधीच खूप मोठा राडा झाला...
2 / 8
हे यजमानपद देताना FIFA चे तत्कालीन सेप ब्लाटर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. कतारमधील वातावरण व येथील कडक नियम हे फुटबॉलपटू व चाहत्यांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत होते आणि त्यात तथ्यही आहेच. कतारमधील उष्ण वातावरणात खेळताना फुटबॉलपटूंची दमछाक होणार हे निश्चित आहे. त्याचवेळी खेळाडूंवर व त्यांना सपोर्ट करण्यासाठी येणाऱ्या फॅन्सवरही अनेक निर्बंध घातली गेली आहेत.
3 / 8
कतार हा मुस्लिमबहुल देश असल्यामुळे येथे स्त्रियांसाठी आजही अनेक बंधनं आहेत, मद्यपानाला परवानगी नाही. त्यामुळे स्त्रीयांच्या पेहराव्यावरही अनेक निर्बंध आहेत.
4 / 8
दोहा येथे मोठमोठ्या इमारतींवर फुटबॉलपटूंच्या प्रतिमा लावलेल्या दिसत आहेत, परंतु येथील नियमांमुळे फॅन्सचा हिरमोड होईल हे नक्की आहे. त्यामुळेच इंग्लंडच्या फुटबॉलपटूंच्या पत्नी, गर्लफ्रेंड्स यांच्यासाठी ११ मजली आलीशान बोटच गल्फ ऑफ ओमान येथे उभी करण्यात आली आहे. गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनासाठी इंग्लंडचा २६ सदस्यीय संघ दोहा येथे दाखल झाला.
5 / 8
खेळाडूंसोबत त्यांच्या पत्नी व गर्लफ्रेंड यांचाही प्रवास आलाच, परंतु त्यांच्यासाठी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंग्लंडकडून खास सोय करण्यात आली आहे. १ बिलियन पाऊंड किंमत ( 96,89,02,81,920.00 भारतीय रक्कम) असलेली आलीशान क्रूझ तैनात ठेवली गेली आहे.
6 / 8
या क्रूझमध्ये सहा स्विमिंग पूल, सॅलोन, रेस्ट्रॉरंट्, बार आदी सर्व सुविधा आहेत. कतारमध्ये मद्यप्राशनाला बंदी आहे आणि नियम मोडणाऱ्याला कारावास होऊ शकतो. शिवाय महिलांच्या पोशाखावरही अनेक बंधनं असल्यामुळे इंग्लंडने हा मार्ग शोधला आहे. या क्रूजवर ६७६२ गेस्ट राहु शकतील एवढी जागा आहे.
7 / 8
इंग्लंडला ब गटात वेल्स, अमेरिका आणि इऱाण यांचा सामना करायचा आहे. २१ नोव्हेंबरला त्यांचा पहिला मुकाबला इराणसोबत आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर ( वि. अमेरिका) व ३० नोव्हेंबर ( वि. वेल्स) अशी लढत होणार आहे.
8 / 8
इंग्लंडला ब गटात वेल्स, अमेरिका आणि इऱाण यांचा सामना करायचा आहे. २१ नोव्हेंबरला त्यांचा पहिला मुकाबला इराणसोबत आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर ( वि. अमेरिका) व ३० नोव्हेंबर ( वि. वेल्स) अशी लढत होणार आहे.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Englandइंग्लंडQatarकतारFootballफुटबॉल