शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मेस्सीचे वर्ल्ड कप सेलिब्रेशन! आईला मिठी मारून लहान मुलासारखा रडला, पत्नी व मुलांसमोर भावनिक झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 11:53 AM

1 / 17
लिओनेल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्ष अथक परिश्रम करत होता अखेर ते आज पूर्ण झाले... वातावरण पहिल्या सेकंदापासून ते रेफरीची अखेरची शीटी वाजेपर्यंत मेस्सीमय राहिले आणि पुढील अनेक वर्ष ते तसेच राहिल याची काळजी मेस्सीने आजच्या खेळातून घेतली.
2 / 17
२०१४ला वर्ल्ड कप विजयाचं भंगलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारानेच अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला. लिओनेल मेस्सीचा अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अर्जेंटिनाच्या प्रत्येक खेळाडूने कोणतीच कसर सोडली नाही. फ्रान्सकडून तोडीसतोड खेळ झाला अन् कायलिन एमबाप्पे एकटा भिडला. १२० मिनिटांच्या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने ४-२ अशी बाजी मारली.
3 / 17
फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात कदाचितच अंतिम सामना एवढा थरारक झाला असेल... ८०व्या मिनिटाला २- ० अशी आघाडी घेणाऱ्या अर्जेंटिनाला गतविजेत्या फ्रान्सने पेनल्टी शूटआऊटपर्यंत नेले... कायलिन एमबाप्पेने १ मिनिट ३७ सेकंदात दोन गोल केले अन् ९० मिनिटांच्या खेळात २-२ अशी बरोबरी राहिली.
4 / 17
३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळात मेस्सीने १०८व्या मिनिटाला अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, पण एमबाप्पे हार मानणारा नव्हता त्याने ११८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली आणि सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला.
5 / 17
२१व्या मिनिटाला डी मारियाला पेनल्टी क्षेत्रात पाडले अन् अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली. अपेक्षांचे प्रचंड ओझं घेऊन मेस्सी पेनल्टी घ्यायला आला अन् त्याने करिष्मा करून दाखवला.
6 / 17
३६व्या मिनिटाला मॅक एलिस्टर चेंडू ज्या पद्धतीने घेऊन पेनल्टी क्षेत्रात घेऊन गेला त्याला रोखण्यासाठी फ्रान्सची फौज उभी राहिली, परंतु त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधलेय हे दिसताच चेंडू डी मारियाला दिला अन् अर्जेंटिनाची आघाडी २-० अशी झाली.
7 / 17
७९व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या निकोलस ओटामेंडीने पेनल्टी क्षेत्रात स्टीव्ह मँडांडाला पाडले अन् फ्रान्सला पेनल्टी मिळाली. कायलिन एमबाप्पेने गोल करून फ्रान्सच्या चाहत्यांना जागं केलं. ८१व्या मिनिटाला एमबाप्पेने अर्जेंटिनाची बचावभींत भेदली अन् सामना २-२ असा बरोरीत आणला. जबरदस्त व्हॉलीद्वारे त्याने हा गोल केला...
8 / 17
१०७व्या मिनिटाला मेस्सीचा गोल रोखला गेला. पुढच्याच मिनिटाला अर्जेंटिनाने गोल केला.. मार्टिनेझचा तो प्रयत्न गोलरक्षकाने रोखला, परंतु चेंडूवर ताबा राखता न आल्याने मेस्सीला गोल संधी मिळाली आणि अर्जेंटिनाने ३-२ अशी आघाडी घेतली.
9 / 17
११६ व्या मिनिटाला हँड बॉलमुळे फ्रान्सला पेनल्टी मिळाली एमबाप्पेने त्यावर गोल करून सामना पुन्हा ३-३ असा बरोबरीत आणला. पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या मेस्सी, डिबाला, लिएंड्रो पेडेरेस व गोंझालो मॉटेई यांनी गोले केले. फ्रान्सकडून एमबाप्पे व रँडल कोलो मौनी यांना गोल करता आले, तर किंग्स्ली कोमन व आरेलोना टी चौमेनी यांनी संधी गमावली.
10 / 17
लिओनेल मेस्सीला Golden Ball हा पुरस्कार दिला गेला... हा पुरस्कार त्या खेळाडूला दिला जातो, ज्याने संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. गोल्डन बॉलने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा गौरव केला जातो. या पुरस्काराच्या स्वरूपात खेळाडूला सोन्याचा चेंडू भेट म्हणून दिला जातो. १९८२ च्या फिफा वर्ल्ड कपपासून हा पुरस्कारही सुरू झाला.
11 / 17
लिओनेल मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण १२ गोल केले आहेत आणि ८ गोल सहाय्य आहे. १९६६ पासूनच्या वर्ल्ड कप इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. लिओनेल मेस्सी हा आज सर्वाधिक २६ वर्ल्ड कप सामने खेळणारा खेळाडू बनला... त्याने लॉथर मॅथौस यांचा २५ सामन्यांचा विक्रम मोडला.
12 / 17
या विजयानंतर सहकाऱ्यांनी मेस्सीला खांद्यावर उचलून घेतले. मेस्सीची आई मैदानावर धावत आली अन् मुलाला घट्ट मिठी मारली.. यावेळी मेस्सी लहानमुलासारखा रडताना दिसला.
13 / 17
मेस्सीने यावेळी पत्नी एंटोनेला रोकुजो व मुलांसह सेलिब्रेशन केलं. मेस्सीचा आजपर्यंत केवळ एका मुलीवर जीव जडलाय. ती म्हणजे मॉडल एंटोनेला रोकुजो. एंटोनेला ही मेस्सीचा मित्र लुकास स्कागलिया याची मावस बहिण आहे. अनेकवर्ष लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मेस्सीने आपली लव्हस्टोरी एका रेडिओवर सांगितली होती.
14 / 17
मेस्सी आणि एंटोनेलो हे एकमेकांना पाच वर्षांचे असतानापासून ओळखतात आणि 20 वय असतानापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांचं लग्नही फार साध्या पद्धतीने झालं. महत्वाची बाब त्यांनी त्यांचं वेडिंग गिफ्ट म्हणून लियो मेस्सी फाऊंडेशनला डोनेशन करण्याचा निर्णय घेतला होता.
15 / 17
लग्नाआधी मेस्सी आणि त्यांची पत्नी एंटोनेलो हे लिव्ह इनमध्ये राहत होते. लग्नाआधीच त्याच्या दोन मुलांनी जन्म घेतला होता. त्याच्या दोन मुलांची नावे थियागो आणि मेटियो अशी आहेत. मेस्सी त्याच्या प्रेयसीची गर्भवती होण्याची कुहाणीही एका वेगळ्याच अंदाजात सांगितली होती.
16 / 17
2012 मध्ये एका सामन्यात मेस्सीने हॅट्रिक लगावली होती. आपल्या या हॅट्रिकवर तो आनंदाने नाचत होता. यावेळी अचानक त्याने बॉल आपल्या टी-शर्टच्या आत ठेवला. मेस्सीचं हे असं करणं अनेकांना बुचकळ्यात टाकणारं होतं. पण नंतर तो बाबा होणार हे सर्वांना कळालं होतं.
17 / 17
2012 मध्ये एका सामन्यात मेस्सीने हॅट्रिक लगावली होती. आपल्या या हॅट्रिकवर तो आनंदाने नाचत होता. यावेळी अचानक त्याने बॉल आपल्या टी-शर्टच्या आत ठेवला. मेस्सीचं हे असं करणं अनेकांना बुचकळ्यात टाकणारं होतं. पण नंतर तो बाबा होणार हे सर्वांना कळालं होतं.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाLionel Messiलिओनेल मेस्सीFranceफ्रान्स