शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

FIFA World Cup Final 2022: फक्त काही तास उरले; उपविजेत्या संघाला मिळणार तब्बल २४८ कोटी रुपये; विजेत्याला त्याहून...

By मुकेश चव्हाण | Published: December 18, 2022 4:16 PM

1 / 8
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आज फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना रात्री साडेआठ वाजल्यापासून पाहता येणार आहे.
2 / 8
दोहाच्या लुसैल स्टेडियममध्ये फायनलची लढत रंगणार आहे. दोन्ही संघ तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहेत. फ्रान्सनं मोरक्को आणि अर्जेंटिनानं क्रोएशियावर मात करुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
3 / 8
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. विश्वचषक ट्रॉफी जिंकणारा संघ विजेतेपदासह करोडो रुपये घेऊन जाईल. फिफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम खूप जास्त आहे आणि केवळ विजेता संघच नाही तर उपविजेता संघ देखील मालामाल होणार आहे.
4 / 8
फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात विजेता होणाऱ्या संघाला ३४७ कोटी रुपये बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. तर उप-विजेता संघाला २४८ कोटी रुपये दिले जाणार आहे. तिसरं स्थान पटकावलेल्या क्रोएशियाला २२३ कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असलेल्या मोरक्को २०६ कोटी रुपये बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.
5 / 8
आता फायनलमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीचीही एक रोमांचक कहाणी आहे. आज फायनलच्या लढतीत विजेत्या संघाला ओरिजनल ट्रॉफी फक्त विजयाचं सेलिब्रेशन करण्यापुरतीच दिली जाणार आहे.
6 / 8
पुरस्कार सोहळा संपला की फिफाचे अधिकारी विजेत्या संघाकडून खरी ट्रॉफी परत घेणार आहेत. याचा अर्थ असा की फ्रान्स किंवा अर्जेंटिना संघाला खरी ट्रॉफी आपल्यासोबत घेऊन जाता येणार नाही. विजेत्या संघाला ड्युप्लिकेट ट्रॉफी दिली जाईल. ही ड्युप्लिकेट ट्रॉफी तांब्यानं बनवलेली असते आणि त्यावर सोन्याचं पाणी चढवलं जातं.
7 / 8
फूटबॉल वर्ल्डकपची सुरुवात १९३० साली झाली होती. त्यावेळी विजेत्या संघाला जी ट्रॉफी दिली गेली तिचं नाव जूल्स रिमेट ट्रॉफी देण्यात आलं होतं. जूल्स रिमेट ट्रॉफी १९७० पर्यंतच चॅम्पियन संघाला दिली गेली. यानंतर वर्ल्डकपची ट्रॉफी नव्यानं डिझाइन करण्यात आली. नव्या ट्रॉफीचं काम इटालियन आर्टिस्ट सिल्वियो गजानिया याला देण्यात आलं होतं. १९७४ सालच्या वर्ल्डकपपासून नवी ट्रॉफी दिली जाऊ लागली. जिला फिफा वर्ल्डकप ट्रॉफी नावानं संबोधलं जाऊ लागलं.
8 / 8
फिफा वर्ल्डकपच्या ओरिजनल ट्रॉफीचं वजन जवळपास ६.१७५ किलो इतकं आहे आणि ती बनवण्यासाठी १८ कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. ट्रॉफीची लांबी ३६.८ सेंटीमीटर आणि व्यास १३ सेंटीमीटर इतका आहे. ट्रॉफीच्या बेसवर मॅलाकाइट स्टोनचे दोन स्तर आवरण देण्यात आलं आहे. १९९४ साली या ट्रॉफीमध्ये थोडा बदल करण्यात आला आणि विजेत्या संघाचं नाव लिहिण्यासाठी ट्रॉफीच्या खाली एक प्लेट लावण्यात आली. फायनलमध्ये विजेत्या संघाला ३४७ कोटी आणि उपविजेत्या संघाला २४८ कोटी रुपयांचं बक्षिस देण्यात येणार आहे.
टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाFranceफ्रान्स