German football league imposed fine on jadon sancho and team mate manuel akanji for haircut
फुटबॉलपटूंना लॉकडाऊनमध्ये केस कापणं पडलं महागात; भरावा लागला लाखोंचा दंड! By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 2:19 PM1 / 6कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन हळुहळू उठविला जात आहे. पण, अजूनही लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केले जात आहे. 2 / 6अशात जर्मनीमध्ये बोरूसिया डॉर्टमंड क्लबच्या दोन फुटबॉलपटूंना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी दंड भरावा लागला आहे. 3 / 6बोरूसिया डॉर्टमंड फुटबॉल क्लबचे दोन खेळाडू जॅडोन सँचो आणि मॅन्युएल अकांजी यांनी मास्क आणि पीपीई किट न घालता केस कापले आणि त्यासाठी त्यांना 8.5 लाखांचा दंड भरावा लागला. 4 / 6जर्मनीतील वृत्तपत्रांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. मास्क न घालून या खेळाडूंनी केस कापल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यावर नेटिझन्सनी विरोध दर्शवला. 5 / 6जर्मन फुटबॉल लीग ( DFL) यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. सँचो आणि अकांजी यांना दंड सुनावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, परंतु दंडाची रक्कम त्यांनी जाहीर केली नाही. या प्रकरणार आणखी चार खेळाडूंचाही समावेश होता. पण, त्यांची नाव जाहीर केलेली नाहीत. 6 / 6 ''DFLने मॅन्युएल अकांजी आणि जॅडोन सँचो यांना दंड सुनावण्यात आला आहे. या खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन केले आहे,'' असे स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आले आहे. या खेळाडूंना त्यांची बाजू मांडण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी दिला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications